Braking news पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये 18 जनावरांना जीवनदान देण्यात थाळनेर पोलिसांना यश



शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंके व त्यांच्या पथकास 18 गोवंश जनावरांना जीवनदान देण्यात पुन्हा एकदा यश आले आहे काल दिनांक 21 नोव्हेंबर रोजी मा. जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित सर यांच्या आदेशाने थाळनरे पोलीस स्टेशन मार्फत रात्री एक कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. 



यावेळी रात्री शिरपूर चोपडा रोडवर हीसाळे गावाजवळ पोलिसांनी वाहनांच्या तपासणी सुरू केल्या होत्या या तपासणी दरम्यान एक वाहन संशयित आढळून आल्याने पोलिसांनी त्या  वाहनाची सखोल तपासणी केली असता सदर वाहन क्रमांक आर .जे 06-  44 79 या  कंटेनर वाहनातून 11 मोठी गोवंश जनावरे व 7 गोवंश वासरे कत्तलीचा उद्देशाने बेकायदेशीररित्या घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले म्हणून वाहनासह तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले असून पहाटे उशिरापर्यंत थाळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते .
सदरच्या कारवाईत 3,40,000 रुपयांची गोवंश जनावरे व 8 लाख रुपये किमतीचा आयशर कंटेनर असा 11,40,000 चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जप्त केलेल्या गुरांना नागेश्वर येथील गोशाळेमध्ये पाठविण्यात येणार असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील आणि त्यांच्या पथकाने केलेल्या कारवाईबाबत  गोरक्षक बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी केलेल्या कार्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .
सदरची कारवाई मा. जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित सो,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव सो,उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने सो यांच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल बैसाने, विजय जाधव ,आर .जी .पावरा ,होमगार्ड प्रविण ढोले, मुकेश कोळी, नरेंद्र कोळी, गणेश कोळी, अनिल पावरा, इत्यादींच्या पथकाने केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने