हभपश्री जनार्दन महाराज काकडे यांना पितृशोक




-नाशिक-शांताराम दुनबळे यांजकडून.                                     नाशिकं-:शहरातील अंबड  येथील श्री.संत निवृत्तीनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व प्रसिध्द किर्तनकार व वारकरी महामंडळाचे नाशिक जिल्हा सदस्य व मार्गदर्शक गुरुवर्य हभपश्री जनार्दन महाराज काकडे परभणीकर यांचे वडील गु.हभप बळीराम महाराज काकडे यांच वृध्दापकाळाने वयाच्या ८५ व्या वर्षी दुःखद निधन झाले, त्यांच्यावर  नुकतेच  अंबड वैकुंठ स्मशान भुमीत अग्नीसंस्कार करण्यात आले.ते जुने जाणते विद्वान किर्तनकार होते.                                त्यांचे अंत्यसंस्कार प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष मा.श्री.दिलीप दातीर,पोलीस निरीक्षक श्री.ह.भ.प.बाबुराव पा.भुसारे,वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब महाराज आहेर, शिवसेना उप प्रमुख मा.श्री.सुभाष गायधनी,क्राईमब्रॅच चे पोलीस काॅन्सटेबल हभपश्री नागरे पाटील, सामाजिक कार्यकर्ते मा. श्री.साहेबराव दातीर,श्रीराम मंदिर सप्ताह कमिटीचे अध्यक्ष हभपश्री पोपटराव फडोळ, त्रंबकेश्वर शहर वारकरी महामंडळाचे उपाध्यक्ष व श्री विठ्ठल प्रसाद  वारकरी शिक्षणसंस्था अध्यक्ष हभपश्री लक्षमण महाराज मोरे,श्री माऊली ज्ञानराज आध्यात्मिक शिक्षण संस्था त्रंबकेश्वर अध्यक्ष हभपश्री गोरख महाराज धात्रक,हभपश्री विष्णु महाराज बोडके,हभपश्री रविंद्र महाराज मोरे, हभपश्री राठोड महाराज,अंबड विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हभपश्री वामनराव दातीर,हभपश्री मदन खांदवे सर,मा.श्री.डाॅ.उदासी,हभपश्री वाल्मिक महाराज महाजन आदी उपस्थीत होते.                                            नाशिक जिल्ह्यात वै.हभप बळीराम महाराज यांचे पुत्र हभपश्री जनार्दन महाराज काकडे यांनी खुप मोठी तरुणांमध्दे क्रांती घडवली, त्यांचे हातुन अनेक विद्वान किर्तनकार,गायक, वादक तयार झाले याचे श्रेय वै.बळीराम महाराज यांना जाते, कारण त्यांनी जर हभपश्री जनार्दन महाराज काकडे यांना जन्म दिलाच नसता तर  आपल्याला हभपश्री जनार्दन महाराज पहायला भेटले च नसते, असे विचार हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर यांनी व्यक्त केले.वै.बळीराम महाराज यांना मान्यवरांतर्फे भावपुर्ण श्रध्दांजली अर्पन करण्यात आली.                                                दशक्रियेनिमित्त हभपश्री गुरुवर्य नामदेव महाराज ढवळे  यांचे दि.२५नोव्हे.स.९ते११हभपश्री जनार्दन महाराज काकडे यांचे किर्तन  संस्थेवर निवासस्थानी दातीरनगर अंबड येथे संपन्न होणार आहे.तरी भाविकांनी कार्यक्रमाचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन हभप प्रविण महाराज शिंगाडे यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने