शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहरातील नामांकित जनकल्याण पतसंस्थेतर्फे शहरातील हात गाडीने सामानाची ने-आण करणारे, ट्रान्सपोर्ट मध्ये हमाली काम करणारे कोणत्याही प्रकारे उन्हाळा, पावसाळा व थंडीची पर्वा न करता पहाटेपासून रोज वृत्तपत्र घरोघरी देणारे युवक अशा 31 श्रमजीवी मंडळींना दिवाळी फराळ व 12 ज्येष्ठ व्यक्तींना सोलापुरी चादरी देण्यात आल्या
पतसंस्था दरवर्षी नेहमीच काहीना काही समाजोपयोगी उपक्रम राबवत असते यावेळेस त्यांनी शहरातील कष्टकरी लोकांचे दिवाळी सुकर व्हावी म्हणून त्यांना दिवाळी फराळ देऊन त्यांना दिलासा दिला
यावेळी जनकल्याण पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप लोहार, चेअरमन विजयसिंह पाटील, संचालक दिलीप चौधरी, सुनील बारी, मॅनेजर शशिकांत चौधरी व सिनेट सदस्य अमोल पाटील इत्यादी उपस्थित होते पतसंस्थे मार्फत गेल्या 24 वर्षांपासून अशा प्रकारचे विविध उपक्रम अखंडपणे राबविले जात आहेत
Tags
news
