शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील गधडदेव जवळ असलेल्या अंबाडुक पाडा येथे 15 नोव्हेंबर रोजी छापा टाकून सांगवी पोलिसांनी 1000 लिटर स्पिरीट जप्त केले. घटनास्थळावरून एकाला ताब्यात घेतले असून या स्पिरीट साठा चा मालक मात्र पळून गेला आहे. तालुक्यातील गधळदेव अंबाडुक पाडा येथे स्पिरिट पासून बनावट मद्य तयार करण्याच्या उद्देशाने संशयिताने भरून ठेवल्याची गोपनीय माहिती सांगवी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली होती त्यांनी हवालदार लक्ष्मण गवळी. योगेश मोरे. योगेश दाभाडे. श्याम पावरा, गोविंद कोळी ,महिला कॉन्स्टेबल सुनीता पवार यांचे एक पथक तयार करून त्यांना सोबत घेऊन अंबाडुक पाडा येथे संशयित बादशहा नाना पावरा यांच्या घरावर छापा टाकला असता पोलिसांना पाहून दोन इसमांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यापैकी एकाला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले .संशयितांच्या घरात पोलिसांनी प्रत्येकी दोनशे लिटरच्या पाच ड्रम मध्ये 1000 लिटर स्पिरीट भरल्याचे आढळले .यामध्ये मालाची किंमत 2 लाख 5 हजार रुपये आहे .पोलिसांनी केसराम हैद्रिया पावरा वय 50 राहणार अंबाडुक पाडा याला अटक केली असून प्रमुख आरोपी बादशहा पावरा मात्र फरार झाला आहे या दोघांच्या विरोधात सांगली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Tags
news
