-केंद्र सरकारतर्फ दरवर्षी १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेबर दरम्यान 'राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताह' साजरा केला जातो.या धर्तीवर राज्यात वाचन चळवळ राबविणाऱ्या युवकमित्र परिवार,कोठली ता.शहादा यांच्यातर्फ वडाळी परिसरातील सार्वजनीक वाचनालयांना मोफत पुस्तक संच भेट देण्यात आले.
वाचन संस्कृती वृद्धीगत व्हावी.सुजाण नागरिक घडावेत यासाठी बोराळे,जयनगर,कळंबु,बामखेडा, वडाळी,कोंढावळ, हिंगणी येथील वाचनालयांना प्रत्येकी आठ पुस्तक प्रमाणे पुस्तक संच भेट देण्यात आले.ज्येष्ठ साहित्यिक प्रा.आबा पाटकरी,सुनेत्रा मराठे लिखित पुस्तके यावेळी भेट देण्यात आली.प्रसंगी चंद्रमणी रायसिंग,प्रवीण महाजन,राहुल वाल्हे,डॉ.लक्ष्मीकांत बोरसे,बादल गिरासे,सुनील बागुल यांच्यासह वाचनालयाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
news
