जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जळोद सटीपाणी रस्ता दुरुस्ती कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार डॉ तुषार रंधे यांच्या शुभहस्ते





धुळे - आज जिल्हा पारिषद बांधकाम विभाग अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी) मधील ग्रा.मा १५० जळोद सटीपाणी  रस्ता दुरुस्ती करणे किमत ४५ लक्ष रु कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार डॉ तुषार रंधे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरपुर विधानसभा आमदार काशीराम दादा पावरा हे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती सत्तारसिंग पावरा जिल्हा परिषद सदस्य भीमराव ईशी पंचायत समिती सदस्य राहूल  पावरा सरपंच आनंदसिंग भंडारी बाबूलाल पावरा बाळासाहेब पाटील तसेच जळोद सटीपाणी ग्रामस्थ उपस्थित होते.आदिवासी बहुल भागातील या रस्त्यांची बऱ्याच जास्त प्रमाणात दुरवस्था झालेली असताना या कामांची सुरुवात होणे म्हणजे गावकऱ्यांची खरी दिवाळी साजरी झाली.  

जिल्हा परिषद अध्यक्ष नामदार  डॉ तुषार रंधे म्हणाले, आपल्या या भागातील रस्त्यांच्या दूर अवस्थेमुळे आपल्या आदिवासी बांधवाना मागील बऱ्याच वर्षापासून शेतात,गाव पाड्यांवर जाणेकरिता समस्या निर्माण होत होत्या.या रस्त्याच्या मंजुरीसाठी  जिप सदस्य सरपंच माझ्याकडे सतत पाठपुरावा करत होते. माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व आदिवासी भागाच्या प्रत्येक पाडे गावपर्यंतचे रस्ते  तयार करण्याचा संकल्प आम्ही हाती घेतला आहे.आमचे मायबाप गावकरी शेतकरी यांची प्रगती हेच आमचे  प्रथम ध्येय असणार आहे.

या रस्त्यांचे काम मंजूर केल्याबद्दल सरपंच व गावकरी यांनी आमदार काशीराम पावरा जिल्हा परिषद अध्यक्ष नामदार डॉ तुषार रंधे पंचायत समिती सभापती सत्तारसिंग पावरा जिल्हा परिषद सदस्य भीमराव ईशी पंचायत समिती सदस्य राहुल पावरा यांचा सत्कार केला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने