शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत वाडी बुद्रुक या गावाचे लोकनियुक्त सरपंच यांच्या कडून दीपावलीनिमित्त आपल्याच गावातील गोरगरीब आणि गरजू महिलांना व विधवा महिलांना भेट देऊन आपली सामाजिक बांधिलकी निभावली आहे .महिला सरपंच यांचे पती भरत दशरथ भिल (दीपक भाऊ) यांनी आपल्या गावातील गोरगरीब आणि गरजू महिलांना दीपावलीनिमित्त साड्यांचे वाटप करून आपले सामाजिक जबाबदारी निभावली आहे .दीपावलीच्या भाऊ बीजच्या दिवशी त्यांनी आपल्या गावातील गोर गरीब, विधवा व वयस्कर अश्या 30 महिलांना साडी वाटप केले आहे . त्यांनी गावातील सामान्य महिलांचा भावनांचा आदर करत हा उपक्रम राबविला म्हणून गावातील महिलांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त केले असून गाव परिसरातून त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे . या वेळी गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, व कस्टकरी महिला उपस्थित होत्या.
Tags
news
