शिरपूर : एच. आर. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या रुचिका चौधरी हिने सुवर्णपदक प्राप्त केले असून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातर्फे घेण्यात आलेल्या चतुर्थ वर्ष बी. फार्मसीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात शिरपुर येथील एच. आर. पटेल इंस्टिट्यूट ऑफ़ फार्मास्यूटिकल एज्युकेशन अँड रिसर्च महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश मिळवले असून त्यात चतुर्थ वर्ष बी. फार्मसीचा निकाल ९८.४८ टक्के लागला. यात चौधरी रुचिका संजय हिने ८.७७ ग्रेड पॉइंट मिळवून विद्यापीठात व महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदकाचाही मान मिळवला आहे.
महाजन महिमा मोहन हिने ८.४३ ग्रेड पाँइंट मिळवून महाविद्यालयात द्वितीय क्रमांक मिळविला असून भारंबे धीरज संजय व बाविस्कर प्रणाली राजेंद्र यांनी ८.२९ ग्रेड पॉइंट मिळवून महाविद्यालयात तृतीय क्रमांक मिळविला आहे. महाजन वर्षा संजय हिने ८.२८ ग्रेड पाँइंट मिळवून महाविद्यालयात चौथा व पटेल गायत्री मानिशभाई हिने ८.२० ग्रेड पाँइंट मिळवून महाविद्यालयात पाचवा क्रमांक मिळवला. तसेच या विद्यार्थ्यांनी जी-पॅट व एन. आय. पी. ई. आर. या राष्ट्रीय परीक्षांमध्ये देखील सुयश प्राप्त केले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. एस. बी. बारी, डॉ. पी. ओ. पाटील, डॉ. डी. डी. पाटील, प्रा. सी. जे. भावसार, डॉ. एल. आर. झवर, डॉ. डी. ए. पाटील, डॉ. व्ही. के. चटप, डॉ. जी. बी. पाटील, प्रा. आर. ई. मुथा, प्रा. पी. एस. बाफना, प्रा. झेड. जी. खान, डॉ. पी. एच. पाटील, प्रा. पी. बी. पाटील, प्रा. एस. एस. शिंदे, प्रा. एस. एन जैन, प्रा. एस. के. पाटील, प्रा. एस. एस. माहेश्वरी, श्री वाय. बी. ठाकूर आदींचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष माजी मंत्री अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, सर्व संचालक व प्राचार्य डॉ. एस. बी. बारी यांनी कौतुक केले.
Tags
news
