शिरपूर : लॉकडाऊन कालावधीतील वाढीव व अवाजवी वीजबिलात सवलत देण्याचे जाहीर आश्वासन सर्वसामान्य व्यापारी व गोरगरीब जनतेला राज्यातील महाविकास आघाडी सरकार व त्यातील नेत्यांनी वेळोवेळी दिले होते मात्र आता हा शब्द फिरवीत सक्तीने बील वसुलीची कार्यवाही करण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री ना. नितीन राऊत यांनी वीज वितरण कंपनीस दिले असून त्याचा निषेध करण्यासाठी व राज्य सरकारने वीजबिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी शिरपूर भारतीय जनता पार्टी तर्फे दि.२३ नोव्हें रोजी सकाळी ११ वाजता विजय स्तंभा चौकात आ. काशिराम पावरा, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, जि. प. अध्यक्ष तुषार रंधे यांचा नेतृत्वाखाली वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले. केरळ, मध्य प्रदेश, गुजरात या प्रदेशात ५० विजबिलात सवलत देण्यात आली आहे या राज्याप्रमाणे महाराष्ट्रात हि सवलत मिळावी अशी मागणी करण्यात आली यावेळी शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, कृउबा समिती चेअरमन नरेंद्रसिंग सिसोदिया, पं. स. सभापती सत्तारसिंग पावरा, जि. प. सदस्य योगेश बादल, रमण पावरा, जिल्हा. उपाध्यक्ष के. डी. पाटील, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष एन. डी. पाटील, चिटणीस चंद्रकांत पिटील, मा. जिल्हा चिटणीस संजय आसापूरे, तालुका उपाध्यक्ष नारायण चौधरी, जयवंत पाडवी, तालुका सरचिटणीस मंगेश भदाणे, चिटणीस सुनिल चौधरी, भटक्या विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष पिंटु बंजारा, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, मुकेश पाटील, प्रशांत राजपुत, शहर चिटणीस अविनाश शिंपी, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, भटक्य विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बापू लोहार, शहराध्यक्ष रविंद्र भोई, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, रविंद्र सोनार, भरत पाटील, भटु माळी, जितेंद्र पाटील, राजुलाल मारवाडी, प्रभाकर सोनवणे, भालेराव माळी, सतीश गुजर, सत्तार पावरा, रफीक तेली, जाकीर तेली, संतोष माळी, सुनिल मगरे, वसंत सुर्यवंशी, अरमान मिस्तरी, भरत पावरा, हंसराज चौधरी, प्रणव भदाणे, मयुर कोळी, अशोक कोळी, संजय पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, विज ग्राहक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Tags
news
