नाशिकच्या कोवींड सेंटरमध्ये तात्पुरत्या स्वरूपात मानधनावरील रिक्त पदे भरा अन्यथा तीव्र आंदोलन-महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे.



नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून .
नाशिक-: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाच्या वतीने नाशिक महानगरपालिका आयुक्त श्री.कैलास  जाधव साहेब यांची भेट रि.पा.ई(आठवले) पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन वरील विषयाचे निवेदन देण्यात आले आहे 

निवेदनात म्हटले आहे की डब्ल्यू एच ओ व केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या इशाऱ्यानुसार हिवाळ्यात पुन्हा एकदा कोरोनाची भयंकर लाट येण्याची शक्यता आहे तसेच शहरात तसेच जिल्ह्यात सारी या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे तरी आपण या विषयाकडे गांभीर्याने लक्ष घालून महानगरपालिकेच्या असलेल्या बिटको हॉस्पिटल झाकीर हुसेन हॉस्पिटल व मनपाच्या इतर हॉस्पिटलमध्ये सेवकांचे पदे रिक्त आहेत त्यात नर्स, वॉर्डबॉय सफाई कर्मचारी टेक्निशियन डॉक्टर यांची तात्काळ भरती करून मानधनावर नियुक्ती करून आपली यंत्रणा सज्ज ठेवावी जेणेकरून कोरोनाची दुसरी लाट आली तरी नाशिक शहरातील नागरिकांची जीवित हानी टळेल त्याच प्रमाणे अगर टाकळी येथील सर्वे नंबर 41 ऑब्लिक 5 कथडा नसलेली विहीर तात्काळ बंद करावी, आगर टाकळी राजवाडा रस्त्यावर रहदारी वाढल्याने कायम छोटे-मोठे अपघात होत असल्याने या रस्त्यावर दुभाजक टाकण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

ह्याप्रसंगी आरपीआय(आठवले) पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे,नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सुनिलभाऊ यशवंते, उत्तर महाराष्ट्र नेते सुशीलकुमार गायकवाड, युवा नेते बाळासाहेब पगारे,वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते जयेश सोनवणे,प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने