शिवसेनेचा जनता दरबाराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आतापर्यंत 78 लोकांचे प्रश्न लागले मार्गी; 20 प्रलंबित -शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके



*शिंदखेडा (प्रतिनिधी)* : तालुक्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे सोमवार दि. 02 रोजी पार पाडलेल्या दुसऱ्या जनता दरबाराला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. सोमवारी झालेल्या जनता दरबारात 78 नागरिकांचे प्रश्न मार्गी लागले. तर 20 प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न चालू आहे. अशी माहिती शिवसेना धुळे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाप्रमुख श्री.हेमंत साळुंके यांनी दिली.
         शिंदखेडा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौफुली शिंदखेडा येथे दर सोमवारी जनता दरबार उपक्रम राबविला जातो. शिंदखेडा व शिरपूर विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरीक, शेतमजूर, कामगार, गरजू यांना दैनंदिन येणाऱ्या शासकीय पातळीवरील अडचणी, अडलेली कामे या जनता दरबारात मार्गी लागत आहे. तक्रार घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य नागरीकांच्या तक्रारीची दखल घेतली जात असल्यामुळे दर सोमवारी जनता दरबाराला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या जनता दरबारात जागेवर समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न होत असल्याने अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. जनता दरबार या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ व पैशांची बचत होत आहे. शिवाय शासकीय कार्यालयात फेऱ्या मारण्यापासून मुक्ती मिळत आहे.  
         शिंदखेडा व शिरपूर विधानसभा मतदार संघातील नागरीकांनी त्यांच्या विविध समस्या घेऊन प्रत्येक सोमवारी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय शिंदखेडा येथे सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत भेटावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. हेमंत साळुंके यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने