शहादा (प्रतिनिधी) :- सोनामाई कला व विज्ञान महिला महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल , महर्षी वाल्मिकी यांची जयंती , स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा करण्यात आला.
सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाचे कला व विज्ञान महिला महाविद्यालयाच्या वतीने लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल , आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती , माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व राष्ट्रीय एकात्मता दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र. प्राचार्य डॉ. भारत चालसे , राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. एस. यू. अहिरराव, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. एच. आर. कुलकर्णी, प्रा. अनिल साळुंके ,प्रा. डॉ. प्रसन्ना डांगे , प्रा. ए. एम. पाटील ,प्रा. ए. बी. अहिरे , सुधाकर नाईक , राजेश राठोड तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल , माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी , महर्षी वाल्मिकी यांचे अभिवादन करण्यात आले. यावेळी प्र. प्राचार्य डॉ. भारत चालसे यांनी , भारत हा जगातील एक महान राष्ट्र असून या पावन भूमीत अनेक महापुरुषांनी आपल्या योगदानातून राष्ट्राला वैभव प्राप्त करून दिले आहे , त्यांचे कार्य , विचार व योगदानाचा व सांगितलेल्या मार्गावर आपण अंगीकार करावा असे प्रतिपादन केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. एस. यू. अहिरराव यांनी राष्ट्रीय एकात्मता दिवस निमित्त राष्ट्रीय एकात्मतेची शपथ उपस्थितांना दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अनिल साळुंके , सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. श्रीमती एच. आर. कुलकर्णी व आभार प्रा. डॉ. प्रसन्ना डांगे यांनी केले , या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Tags
news
