भोरखेडा गावाजवळ अज्ञात तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू




 (राजकुमार जैन शिरपूर)
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्याती थालनेर पोलीस स्टेशन अंतर्गत शिरपूर चोपडा रोडवर बोरखेडा गावालगत एका अनोळखी इसमाचे डेड बॉडी मिळून आली असून त्याची ओळख पटवण्यात बाबत थाळनेर पोलिसांनी आवाहन केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की थाळनेर तालुका शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर 61/  2020 अन्वये एक अनोळखी इसम पुरुष अंदाजे वय पंचवीस वर्ष गाव माहित नाही डोक्याचे केस आणि दाढी वाढलेली उंची अंदाजे पाच फूट पाच इंच अंगाने सडपातळ चेहरा गोल, वरनानी गोरा असलेला त्याच्या हातावर अनिल यादव निर्मला यादव असे गोंदलेले आहे त्याच्या अंगात काळ्या रंगाचा शर्ट आणि करड्या रंगाची फुल पॅन्ट असून तो बिना नंबर प्लेट ची बजाज कंपनीची ct 100 निळे पट्टे असलेली गाडी दुचाकी मोटरसायकल विना नंबरची ,मोटार अपघातात तिच्या हँडल वाकलेला असून हेडल तूटलेला ,इंडिकेटर देखील खाली तुटलेल्या अशा अवस्थेत,  दिनांक 02 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शिरपूर ते चोपडा रोडवर भोरखेडा या गावाच्या जवळ मयात स्थितीत आढळला आहे, अज्ञात वाहनाने ठोस मारल्याने सदरच्या युवक मोटार अपघातात दुखापती होऊन मयत झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. त्याच खाजगी वाहनाने कॉटेज हॉस्पिटल शिरपूर येथे दाखल करण्यात आले आहे सदर युवकाचे  मृतदेह उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे पी एम रूममध्ये ठेवण्यात आले असून त्याच्या वारसाच्या शोध घेणे सुरू आहे, पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे की वरील वर्णनाच्या इसमाच्या बाबत आपल्याला काही माहिती असल्यास त्याच्या नातेवाईकांची व त्याची ओळख पटवण्यात आम्ही मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे या व्यक्तीची ओळख पटल्यास दूरध्वनी क्रमांक 02563 - 2 85 233 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन थाळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रसाळ यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने