शिरपुर प्रतिनिधी : काेराेना महामारी आजही संपली असे म्हणता येणार नाही. जागतीक आरोग्य संस्थेच्या वतीने दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र याेग्य खबरदारी घेतल्यास दुसरी लाट देखील थाेपवु शकताे. तर पाेलिस पाटील प्रशासनातील प्रथम पायरी आहे. कुठलीही शासकीय याेजना राबविण्यासाठी प्रशासनाला ग्रामीण भागात पाेलिस पाटील यांची मदत घ्यावीच लागते. त्याशिवाय याेजना घराघरात पाेहचविणे कठीण आहे. काेराेना काळात पाेलिस पाटील यांनी प्राणाची बाजी लावत निस्वार्थ भावनेने उत्तम काम केले. शेकडाे वर्षापुर्वी गावगाडा चालविण्यासाठी पाटील पद हाेते. कालांतराने ब्रिटिश शासनाने त्यांचा कारभार चालविण्यासाठी पाेलिस पाटील पदाची निमिर्ती केली. मात्र आता देखील या पदाचे महत्व कमी झाले नाही. काेराेना काळात ग्रामीण भागात प्रादुर्भाव राेखण्यासाठी पाेलिस पाटील यांनी स्वताला झाेकुन दिले. ग्रामीण भागात उत्तम नियोजन व काम पाेलिस पाटील यांनी केले आहे. आज त्यांचा काेराेना याैध्दा म्हणुन सत्कार करतांना आनंद आहे. कारण पाेलिस पाटील यांनी काम करतांना साेपविलेली जबाबदारी प्रामाणिक पणे पार पाडलीी. कधीही विश्वासाला तडा जावु दिला नाही. असे मत शिरपुरचे उपविभागीय अधिकारी विक्रमसिंह बांदल यांनी व्यक्त केले.
उंटावद ता. शिरपुर येथील सुलाई माता मंदिर याठिकाणी आज दि. ०२ राेजी महाराष्ट्र राज्य गाव कामगार संघटना शिरपुर तालुका यांच्या वतीने
"काेराेना याेध्दा" गाैरव साेहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरपुरचे उपविभागीय अधिकारी विक्रमसिंह बांदल तर उदघाटक म्हणुन शिरपुरचे तहसिलदार आबा महाजन, प्रमुख पाहुणे म्हणुन गटविकास अधिकारी वाय. डी. शिंदे, थाळनेर पाेलिस स्टेशनचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक सचिन साळुंखे, शिरपुर शहर पाेलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील, उपनिरीक्षक श्री. मुरकुटे, तर व्यासपीठावर पाेलिस पाटील संघटनेचे जिल्हा अध्यक्ष छाेटुलाल पाटील, पं. स. सदस्य रामकृष्ण महाजन, उंटावद सरपंच राजकपूर मराठे, माजी पाे. पा. जगन्नाथ गुजर, पंडीतराव पाटील आदी उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी विक्रमसिंह बांदल यांनी दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करत कार्यक्रमाची सुरूवात केली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते जागतिक महामारी काेविड १९, या कालावधीत आपले प्राण पणाला लावुन उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या *पाेलिस पाटील बांधव यांचा *काेराेना याेध्दा* म्हणुन शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देवुन गाैरव करण्यात आला.
यानंतर शिरपुरचे तहसिलदार आबा महाजन यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, गावागावातील पाेलिस पाटीलांनी प्रशासनासाेबत काम केले. म्हणुन आपण काेराेना मुक्तीच्या उंबरठ्यावर आहाेत. दुसरी लाट येण्याची शक्यता असली तरी आपण दुसऱ्या लाटेला बाहेर थाेपवु तर काेराेना मुक्तीसाठी सर्वांनी मेहनत घेतली सर्वांचे आभार मानताे.
यानंतर गटविकास अधिकारी वाय. डी. शिंदे यांनी सांगितले की, तालुक्यातील १४७ गावांपैकी ७५ गावात काेराेना बाधित रूग्ण आढळून आले. या प्रसंगी पाेलिस पाटील यांचे माेलाचे सहकार्य लाभले.
सहाय्यक पाेलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, पाेलिस पाटील यांचा प्रशासनाच्या वतीने सन्मान व्हायला हवा हाेता मात्र संघटनेच्या वतीने हाेत असला तरी आमचे सहकार्य नेहमी राहील. पाेलिस पाटील ग्रामीण भागातील पहिला पाेलिस आहे. अनेक गुन्ह्याच्या तपास कामी त्यांची मदत हाेते अशीच मदत पुढे व्हावी.
थाळनेरचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, शिरपुर तालुक्यातील पाेलिस पाटील सर्वांत कार्यक्षम असुन काेराेना काळात खुप माेठी मदत झाली. पाेलिस पाटील हा प्रशासनातील प्रत्येक विभागातील महत्वाचा कणा आहे. पाेलिस पाटील यांच्या कामगिरीवर पुस्तक लिहिता येईल. चांगले पाेलिस पाटील लाभने हे आमचे भाग्यच समजताे. यानंतर संघटनेच्या वतीने पिंप्रीचे पाेलिस पाटील जयपालसिंह गिरासे यांनी आपले मनाेगत व्यक्त करतांना पाेलिस पाटील यांच्या समस्या अडचणी वर प्रकाश टाकला तर पाेलिस पाटील यांच्या विविध मागण्या मांडल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरपुर तालुका पाेलिस पाटील संघटना अध्यक्ष राजेंद्र सातकर, सुत्रसंचालन बाळदे पाेलिस पाटील विठ्ठल पाटील तर आभार खर्दे पाेलिस पाटील सुरेश साेनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेंद्र दाेरीक, विठाेबा गाेसावी, सुरेश साेनवणे, भुषण पाटील, किशाेर पाटील, सुंदरलाल पावरा, लवकुश पावरा, सुभाष पावरा, राजकीरण राजपूत, पंकज पाटील, याेगश्वर पाटील, भाेजु भिल, नितीन जाधव, कमलाकर रायसिंग, अमाेल पाटील, गाेपाल काेळी, विकास पाटील, अर्चना धनगर, जयवंता भिल, रूपाली बैसाणे, अर्चना कढरे, प्रतिभा मराठे, प्रतिभा मंगळे, किरण धनगर, दिपक सनेर, धनंजय सांळुखे, विनय माळी आदीनी परिश्रम घेतले.
कॅप्शन: उंटावद तालुका शिरपुर येथे काेराेना याेध्दा गाैरव साेहळा प्रसंगी मार्गदर्शन करतांना उपविभागीय अधिकारी विक्रमसिंह बांदल तर व्यासपीठावर तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी वाय. डी. शिंदे, सहाय्यक पाेलिस निरीक्षक सचिन साळुंखे, सहाय्यक पाेलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील, उपनिरीक्षक श्री. मुरकुटे, पाे. पा. संघटना जि. अध्यक्ष छाेटुलाल पाटील आदी.
Tags
news
