दोंडाईचा नंदुरबार रस्त्यावर रामी फाट्याजवळ भिषण अपघात सदरील व्यक्ती जागेवरच ठार





प्रतिनिधी:-दिग्विजयसिंग राजपुत
     दोंडाईचा नंदुरबार रस्त्यावर रामी फाट्या जवळ धावडे येथील रहीवासी पिंटू नारायण ठाकरे (अदिवासी) वय ३५ ते ३६ यांचे दि.२ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री ०७ ते ७:३० च्या दरम्यान भिषण अपघात झाला अपघाताचे कोणतेही कारण स्पष्ट झालेले नाही धावडे येथील रहीवासी पिंटू ठाकरे MH.18 Q.5849 या नंबर पेल्ट असलेली मोटारसायकल वर एकटे प्रवास करत असतांना त्यांचा दोंडाईचा नंदुरबार रस्त्यावर रामी फाट्या पासून ५०० मिटर अतंरावर भिषण अपघात झाला असून सदरील व्यक्ती जागेवरच ठार झाले सदरील व्यक्ती ला दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालय येथे रवाना करण्यात आले.
      अपघात उघडीवर आला तेवढ्यात युवापत्रकार दिग्विजयसिंग राजपुत रामी पथारे व झिरवे धावडे येथील तरूणांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले घटनास्थळी ताबडतोब दोंडाईचा पोलीस ठाण्याचे PSI दिनेश मोरे सह त्यांचे सहकारी यांनी पाहणी केली पुढील कारवाई सुरू आहे रामी येथील पोलीस पाटील श्रीकांत वाघ यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने