ईश्वर माळी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण सोहळा साजरा

 


शहादा (प्रतिनिधी) :  महात्मा फुले नगर वडाळी येथे महाजन कॉम्प्युटर चा वतीने महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष ईश्वर माळी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण  सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी वडाळी चे पोलीस पाटील गजेंद्रगिर गोसावी यांनी सांगितले की जास्तीत जास्त वृक्षारोपण कसे होईल या विषयावर माळी हे भर देत असतात व त्यांचे वृक्षांविषयी ची प्रेम पाहता आम्हालाही आनंद वाटतो व त्यांच्या या प्रयत्नांनी परिसर लवकरच सुजलाम सुफलाम व्हायला उशीर लागणार नाही म्हणून प्रत्येकाने वृक्ष लागवडीत त्यांची साथ द्यावी असेही सांगितले तसेच सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन प्रकाश जगताप, तंटामुक्ती अध्यक्ष रामकृष्ण पांडुरंग गोसावी, आरपीआय जिल्हाध्यक्ष आ.बी.नगराळे , काँग्रेसचे विद्यार्थी आघाडी चे तुषार गोसावी, कोंढावळ ग्रामपंचायतीचे डॉ. अशोकजी जगताप, महात्मा फुले युवा मंच चे शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राकेश माळी, वडाळी येथील नामांकित व्यवसायिक ज्ञानेश्वर जाधव, तसेच माझी ग्रामपंचायत सदस्य दीपक भाई पाटील, जलसंपदा निरीक्षक अरुण निझरे, तसेच ब्रिजलाल पटेल, किशोर माळी उमेश बाविस्कर कोढावळ चे अक्षय माळी विनोद माळी, जयेश निकम महात्मा ज्योतिबा युवा मंच शहादा उपाध्यक्ष विकास सोनवणे हे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन महाजन सर यांनी केले. प्रकाश जगताप यांनी  ईश्वर माळी सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच सर्वांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने