शीर्षक नाही

 



 

     धुळे, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील गौण खनिजाचे अवैध उत्खनन, वाहतूक व साठवणुकीस प्रभावीपणे आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या निर्देशानुसार भरारी/दक्षता पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी किशोर घोडके यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

     महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक व साठवणुकीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे शक्य व्हावे म्हणून महसूल, पोलिस, परिवहन अधिकारी यांचा समावेश असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली भरारी, दक्षता पथके कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार या पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.

या पथकांचे प्रमुख म्हणून जिल्हा खनिकर्म अधिकारी आहेत. त्यांचा मोबाईल क्रमांक 7972169087 असा आहे. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथील टोल फ्री क्रमांक 1077 असा आहे. धुळे जिल्ह्यातील गौण खनिजाचे अवैध उत्खनन, वाहतूक, साठवणुकीसंदर्भात तक्रार नोंदवायची असल्यास वरील मोबाईल क्रमांक व टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने