शिरपूर शहर शिवसेनेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात




शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहर शिवसेनेतर्फे प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान शहर शिवसेना संपर्क कार्यालय शिरपूर येथील सुरुवात करण्यात आली असून या कार्यक्रमाचे नियोजन शिरपूर शहर प्रमुख मनोज धनगर यांनी केले आहे .सदर नियोजनात तालुक्यातील अनेक युवकांना शिवसेनेकडे आकर्षित करून त्यांना शिवसेनेचे प्राथमिक सदस्य म्हणून स्वीकार करून त्यांना शिवसेनेच्या कार्यकर्ता बनवण्यासाठी मनोज धनगर हे प्रयत्न करत असून शिवसेनेच्या या कार्यक्रमाला धुळे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे ,ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे धुळे जिल्हा संघटक मंगेश पवार, उपजिल्हाप्रमुख भरत सिंह राजपूत, उपजिल्हा संघटक वि.भा .जोगराणा,तालुकाप्रमुख दीपक चोरमले ,एसटी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू टेलर, शहर संघटक प्रेम कुमार चौधरी, उपशहरप्रमुख बंटी लांडगे, योगेश ठाकरे, सिद्धार्थ बैसाने, विकास महिरराव ,गोलू मराठे, सचिन शिरसाट लक्ष्मण मराठे, जीतू पाटील आकाश जाधव ,बबलू शेख ,वजिद मलिक, रेहान काजी , इदरीस शहा, शाहरुख शहा, मोहसीन पलक, प्रशांत पाटील ,प्रशांत धनगर, चेतन  ईशी,अक्षय धनगर, संतोष कोळी, विशाल सोनवणे ,संतोष हटकर ,निलेश वाल्हे सोमनाथ लांडगे ,मयुर महाले ,आकाश जाधव, सोनू चौधरी, मनीष पाटील ,तसेच सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी विभाग प्रमुख व उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख सर्व शिवसैनिक यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने