डॉ व्ही व्ही रंधे इंग्लिश मेडिअम स्कूल शिरपूर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरा

  



शिरपूर - किसान विद्या प्रसारक संस्था संचालित डॉ.व्ही.व्ही. रंधे इंग्लिश मेडिअम स्कूल शिरपूर येथे थोर विचारवंत समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रबिंदू ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली व स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवली.शाळेच्या मुख्याध्यापिका कामिनी पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे माल्यार्पण करून अभिवादन केले.या प्रसंगी प्रमोद पाटील, सारिका ततार,रमाकांती विश्वकर्मा, पदमा सूर्यवंशी, कल्याण राजपूत, प्रशांत बोरसे आदी उपस्थित होते. विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान राजपूत  यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने