एस पी डी एम महाविद्यालय शिरपूर च्या त विद्यार्थ्यांचे विद्यापीठ परीक्षेत सुयश




शिरपूर प्रतिनिधी -   शिरपूर शहरातील किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कला वाणिज्य व सायन्स शैक्षणिक  शिक्षणाचे दालन असलेल्या एस पी डी एम महाविद्यालय शिरपूर च्या विद्यार्थ्यांनी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी घेतलेल्या परीक्षांमध्ये सुरेश प्राप्त केले असून गुणवत्ता यादीत सर्वोच्च स्थान प्राप्त करत सुवर्णपदक देखील प्राप्त केले आहे

एम .एस सी भूगोल या वर्गात माळी कल्पना हिरालाल ही विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत प्रथम येऊन सुवर्णपदकाची मानकरी ठरली याच विभागातील माळी स्वाती रवींद्र ही विद्यार्थिनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत तिसऱ्या क्रमांकाने यशस्वी ठरली आहे .रसायनशास्त्र विभागातील एम.एस.सी. इनोर्गानिक या विषयात चांदनी सूर्यवंशी ही विद्यार्थिनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत सर्वप्रथम येऊन सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहे तसेच जाधव जागृती जितेंद्र राहणार मांजरोद तालुका शिरपूर जिल्हा धुळे या विद्यार्थिनीने महाविद्यालयात एम. एस.सी.ऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयांमध्ये विद्यापीठातून फर्स्ट रँक मध्ये पास होण्याचा बहुमान पटकावला आहे .व महाविद्यालयात सर्वप्रथम आली आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या विद्यार्थिनीने हे यश संपादन केल्यामुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे तिच्या या यशामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.
 या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार महाविद्यालयाचे विश्वस्त व कुलसचिव रोहित रंधे यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस. एन .पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला .तज्ञ प्राध्यापक अद्ययावत प्रयोगशाळा समृद्ध ग्रंथालय सराव परीक्षा यामुळे यश संपादन केल्याचे विद्यार्थ्यांनी मनोगतातून सांगितले यशस्वी विद्यार्थ्यांना भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर मनीषा पाटील ,डॉक्टर सुनील गोराणे व विभागातील प्राध्यापकांचे तसेच रसायनशास्त्र विभागातील डॉक्टर एस .पी. महिरे ,प्राध्यापक पी .जी .पाटील  प्राध्यापक विलास महाले प्राध्यापक चौधरी प्राध्यापक संदीप सोनवणे डॉक्टर शरद पाटील व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळाले विद्यार्थ्यांनी उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल रोहित्र व प्राचार्य डॉक्टर पटेल यांनी समाधान व्यक्त केले उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर दिनेश पाटील, डॉक्टर एम वी  पाटील ,अधीक्षक संजय निकम यु.पी पावरा, भुषण पाटील, गोपीचंद अहिरे या सह प्राध्यापक व इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने