आमोदे येथील यात्रा उत्सव कोरोना मुळे रद्द, पारंपरिक पद्धतीने होणार पूजाअर्चा



शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील आमोदे येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त श्री 
सारंगेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात यात्रा उत्सव सालाबादाप्रमाणे आयोजित करण्यात येत असतो .मात्र यंदा कोरोणामुळे यात्रा उत्सवाच्या कार्यक्रम रद्द करण्यात आला असून फक्त त्या दिवशी परंपरेनुसार तगररावांची पूजा केली जाणार आहे .दि. 30 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा निमित्त श्री सारंगेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात गावात सालाबादाप्रमाणे यात्रोत्सव भरत असतो मात्र सध्या कोरोनाची लाट परतण्याची  शक्यता असल्याने गर्दी होऊन  संसर्ग होऊ नये म्हणून ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी या वर्षाच्या यात्रा उत्सवाच्या कार्यक्रम रद्द केला आहे. आमोदे गावा जवळील सुमारे तीन ते चार एकर क्षेत्रात सारंगेश्वर मंदीर हे महादेवाचे निसर्गरम्य मंदिर  असल्यामुळे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात ग्रामस्थांच्या सहकार्यातून प्राचीन कालीन महादेव मंदिर व परिसराचे रूप पूर्णपणे पालटले आहे .मंदिराचे अद्याप कोणतीही ट्रस्ट नसून गावकऱ्यांच्या सहकार्याने मंदिराची उभारणी फार वर्षांपूर्वी करण्यात आली होती. सदरील मंदिरात शिवलिंग ही उगम पावली आहे अशी मान्यता आहे. तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त केल्याने मूलभूत सुविधा व भक्त निवास येथे बांधण्यात आले आहे .आमदार काशीराम पावरा यांच्या निधीतून मंदिरात ये जा करण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे .या मंदिरात कालसर्प व इतर धार्मिक विधी होत असतात दरवर्षी स्वरामगिर बाबा यांच्या स्मरणार्थ भंडाराच्या कार्यक्रम देखील पार पाडत असतो. श्रावण महिन्यात भाविक दर्शनासाठी येथे मोठ्या भक्तिभावाने गर्दी करतात मात्र यावर्षी यात्रा उत्सव कार्यक्रम रद्द झाल्यामुळे गावात नेहमीप्रमाणे होणारा लोकनाट्य तमाशा मंडळाच्या कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला आहे  मंदिरात येणाऱ्या भाविकांनी सोशल डिस्टंसिंग पालन करत दर्शनाचा लाभ घ्यावा व गर्दी करू नये असे आवाहन सरपंच हर्षाली रवींद्र देशमुख, उपसरपंच कल्‍पनाबाई आनंद भिल, गटनेता जगदीश देशमुख इत्यादींनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने