शिरपूर : आर.सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट शिरपूर व धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच शिरपूर तालुका विधी सेवा समिती आणि शिरपूर तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.28 ऑक्टोबर 2020 रोजी सायबर सुरक्षा या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले.
या सायबर सुरक्षा मार्गदर्शनाच्या कार्यक्रमासाठी न्या. संभाजी देशमुख (अध्यक्ष, विधी सेवा समिती, शिरपूर तथा दिवाणी न्यायाधीश क. स्तर, शिरपूर) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. विजय शितोळे (सह-दिवाणी न्यायाधीश क. स्तर, शिरपूर), ऍड. शांताराम महाजन (अध्यक्ष शिरपूर तालुका वकील संघ), ऍड. निखिल सोनवणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दि. 28 ऑक्टोंबर 2020 या वेबिनार मार्गदर्शनामध्ये एम.सी.ए., इंटीग्रेटेड एम.सी.ए., एम. एम. एस., बी.सी.ए., बी.बी.ए., बी.एम.एस. या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी उत्स्फुर्तपणे भाग घेतला.
या वेबीनारच्या सुरवातीस डॉ. मनोज पटेल यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय व स्वागत केले. त्यानंतर परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील यांनी प्रस्तावना मांडली. प्रथम सत्रात न्यायाधिश विजय शितोळे, ऍड. शांताराम महाजन, ऍड. निखिल सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत प्राथमिक मार्गदर्शन केले.
द्वितीय सत्रात प्रमुख वक्ते न्या. संभाजी देशमुख यांनी आपल्या व्याख्यानात पासवर्ड व्यवस्थापन, ई-मेल सुरक्षा, संगणक व्हायरस, सुरक्षीत वेब ब्राउझिंग, सुरक्षित ऑनलाईन शॉपींग, सुरक्षीत वायरलेस वायफाय वापर, सुरक्षीत सोशल मिडीया वापर, क्रेडीट व डेबिट कार्डचा सुरक्षीत वापर या विविध विषयांवर अतिशय सोप्या पध्दतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मंत्रमुग्ध केले.
परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील यावेळी म्हणाल्या, या वेबीनारचे फलश्रृत म्हणुन परिसंस्थेतील विद्यार्थी व कर्मचारी हे आपल्या दैनंदीन जीवनात अंमलबजावणी करतील.
आयोजन करिता परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील व एम.सी.ए. विभागप्रमुख प्रा. मनोज बेहेरे व एम.एम.एस विभागप्रमुख डॉ. मनोज पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. डी. एम. मराठे, प्रा. मनोज सोनवणे, प्रा. केदार आपटे, प्रा. अमित पाटील, प्रा. महेश भावसार, प्रा. विशाल पवार तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
Tags
news
