शिरपूर : तालुक्यातील टेकवाडे येथे आर.सी.पटेल माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयातील पर्यवेक्षक बी.एस.जमादार यांचा सेवापूर्ती सोहळा लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य सिद्धार्थ पवार होते.
प्रथम सेवापूर्ती कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेचे आश्रयदाते स्व. पप्पाजींच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण विद्यालयाचे प्राचार्य सिद्धार्थ पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यवेक्षक बी.एस.जमादार यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य हजर होते. त्यांच्या धर्मपत्नी सौ.सरलाताई राजपूत, जावई रोनकसिंग राजपूत, मुलगी कल्याणी राजपूत, मुलगा हरपालसिंग राजपूत, पर्यवेक्षक के.एस.मराठे, सर्व शिक्षक व सर्व शिक्षकेतर कर्मचारी सामाजिक अंतर ठेऊन उपस्थित होते.
प्राचार्य यांनी विद्यालयामार्फत शाल, पुष्पहार, कपडे व भेट वस्तू देऊन सपत्नीक सत्कार केला. या कार्यक्रमाला हजर असलेले सर्व शिक्षक बंधू-भगिनी मार्फत गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
पर्यवेक्षक बी.एस.जमादार यांच्या भावी जीवनाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. उपशिक्षक एस.एम पाटील व पर्यवेक्षक के.एस.मराठे, निरोपार्थी बी.एस.जमादार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य सिद्धार्थ पवार यांनी बी.एस.जमादार यांच्याविषयी, त्यांनी शाळेसाठी केलेल्या सेवेविषयी गौरोवोद्गगार काढले. तसेच निवृत्तीच्या कालखंडामध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहो याबद्द्दल शुभेच्छा ही दिल्या. सूत्रसंचालन उपशिक्षक ए.जे.पाटील यांनी केले तर आभार जे.व्ही.पाटील यांनी मानले.
Tags
news
