शिरपूर : तालुक्यातील चीचपाणी (बुडकी गावाजवळ) या गावातील घरे पूर्णपणे उध्वस्त झालेल्या तिन कुटुंबाना माजी मंत्री अमरिशभाई पटेल, तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या वतीने तिन महिन्यांचा किराणा माल, रेशनचे वाटप करण्यात आले.
चीचपाणी येथे २ ऑक्टोबर २०२० रोजी चक्रीवादळ आले होते. त्यात दशरथ जेला पावरा, किसन जेला पावरा, फत्तेसिंग रंगो पावरा यांची घरे पूर्णपणे उध्वस्त झाले होते. या तिनही कुटुंबाना शनिवारी दि. १४ नोव्हेंबर रोजी आमदार काशीराम पावरा यांनी तिन महिन्यांचे किराणा माल, रेशनचे वाटप केले. तसेच शासन स्तरावरून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे यावेळी आमदार काशीराम पावरा यांनी सांगितले.
यावेळी आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषद सदस्य जताबाई पावरा, रमन पावरा, सुकराम पावरा, बिसन पावरा, राजल पटले, ग्रामस्थ उपस्थित होते.
तालुक्यात कुठेही कोणत्याही प्रकारची दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली किंवा काही नैसर्गिक संकट ओढवले तर
माजी मंत्री अमरिशभाई पटेल, तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या वतीने लगेच मदत करण्यात येत असल्याने ग्रामस्थ यांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येते.
Tags
news
