शिरपूर - यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठात जयहींद कोलेज चा डंका वाजला असून एम. सी. जे. पदवी अभ्यासक्रमात
शिरपूर तालुक्यातील भिमराव पवार प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
नुकत्याच यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ पदवीका अभ्यास क्रमाचा निकाल जाहीर झाला. त्यात एम .सी .जे .डिप्लोमाचा विद्यार्थी भिमराव खंडु पवार विखरण ता शिरपूर जि धुळे यांनी 95 . 50 '/. टक्के गुण संपादन करून उत्तर महाराष्ट्रात (खादेशात )सर्व पथम येण्याचा मान पटकावला. या अभ्यास केंद्राचे सर्व विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह गुण संपादण करुन उत्तीर्ण झाले आहेत. यात भीमराव पवार हे अति सामान्य कुटुंबातील असून प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून त्यांनी हे यश संपादन केले आहे. भिमराव पवार यांच्या या यशाबद्दल शिरपूर तालुका भारतीय पत्रकार संघाच्या वतीने , तालुका अध्यक्ष युवराज माळी सर , पत्रकार प्रदीपदादा दहीवदकर , मंगेशभाऊ माळी व आदी पत्रकार मित्रांनी सत्कार केला . भारतीय पत्रकार महासंघ, न्युज पेपर एडिटर्स अँड रिपोर्ट्स असो व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, करणी सेना, व निर्भीड विचार न्युज परिवारा कडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशामागे प्रा. मोहण मोरे सर यांचा खारीचा वाटा आहे विद्यार्थ्यांनी तसे बोलुन दाखवले आहे
जयहींदचे चेअरमन दादासाहेब डाँ अरूनराव साळुंखे ,व्हा चेअरमन मा. भाऊसाहेब प्रमोदजी पाटील, सचीव मा. प्रदीप भदाणे सर्व सन्माननीय संचालक, झेड. बी. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. पी. एच पवार, प्रा. मोहण मोरे, निखील पाटील , मनीष मोरे , यांनी अभिनंदन केले आहे
Tags
news
