शिरपूर प्रतिनिधी- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिरपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धीरज चंद्रकांत सोनवणे यांना बढती देऊन सदरचे निवड केली आहे. तसेच जिल्हा सरचिटणीस पदी दिनेश पाटील व बाळासाहेब पाटील यांची देखील निवड जाहीर करण्यात आली आहे. धुळे येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निरीक्षक संदीप पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले, प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित शिसोदे ,प्रदेश सचिव सुमित पवार ,धुळे युवक जिल्हाध्यक्ष मयूर बोरसे पाटील, शिरपूर तालुका अध्यक्ष रमेश करनकाळ, शहराध्यक्ष युवराज राजपूत, आशिष आहिरे ,आदी उपस्थित होते या बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा व तालुकास्तरीय पद नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या यात येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धीरज चंद्रकांत सोनवणे यांची शिरपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली तसेच जिल्हा सचिव दिनेश महादु पाटील शिंगावे बाळासाहेब शिवाजी पाटील अर्थे, तालुका उपाध्यक्ष पदी यशवंत दत्तू पाडवी मोहिदा ,तालुका संघटक पदी प्रफुल्ल हनुमंतराव पाटील जवखेडा यांची देखील निवड जाहीर करण्यात आली या तिघांनी मतदारसंघात पक्ष वाढवण्यासाठी काम करणार असल्याचे आपल्या प्रतिक्रियेत सांगितले आहे
Tags
news
