शिरपुर बाजार समिती 18 नोव्हेंबरपासून कापूस खरेदीला सुरुवात ,शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन



शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सी.सी.आय तर्फे दिनांक 18 नोव्हेंबरपासून कापूस खरेदी सुरू होणार आहे. सकाळी 10 वाजता आमदार काशीराम पवार यांच्या हस्ते कापूस खरेदीला प्रारंभ होईल शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी आणतांना आणि स्वच्छ कापूस आणावा पाणी मारलेला कापूस स्विकारला जाणार नाही. नैसर्गिक आद्र्ता त्याचे प्रमाण 12 टक्के पेक्षा अधिक असल्यास असा कापूस खरेदी केला जाणार नाही .कापूस विक्रीस आणताना प्रत्येक वेळी सोबत नवीन सातबारा उतारा प्रत व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक च्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत आधार कार्डची झेरॉक्स प्रत मोबाईल नंबर सोबत आणावा शेतकऱ्यांना आरटीजीएस एनईएफटी किंवा ऑनलाइन पेमेंट करण्यात येणार आहे सार्वजनिक सुटीच्या दिवशी कापूस खरेदी बंद राहील .सद्यस्थितीत कापूस प्रतिक्विंटल लांब धागा यासाठी 5 हजार 825 रुपये व आखूड धागा साठी 5 हजार 550 रुपये दराप्रमाणे खरेदी केला जाणार आहे. शेतकऱ्यांनी हा शेतमाल खरेदी केंद्रावर विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती नरेंद्र उपसभापती व संचालक मंडळाने केले आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने