शिरपूर - शरद पवार साहेब यांच्या जीवनावर आधारित लेख स्पर्धेत शिरपूर तालुक्यातील दगा लोटन पाटील यांचा तृतीय क्रमांक आला आहे.
शिरपूर तालुक्यातील वणावल गावचा हा तरुण,बुलढाणा येथे हिंदी शिक्षक म्हणून कार्यरत आहे.
माजी मंत्री केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खासदार शरद चंद्रजी पवार हे गेले 52 वर्ष राज्याच्या व देशाच्या कायदे मंडळात कार्य केलेले एकमेव नेते आहेत पवार साहेबांनी ऐंशीव्या वर्षात पदार्पण केले असले तरी त्यांच्याविषयी तरुणवर्गात आजही कुतूहल आहे. यानिमित्ताने एका आगळ्यावेगळ्या राज्यस्तरीय स्पर्धेचे शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे यांच्या तर्फे आयोजन करण्यात आले होते कोरोणा संसर्ग आणि देशव्यापी लॉक डाऊन च्या धर्तीवर स्पर्धेसाठी लेख पाठवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .या स्पर्धेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून 500 पेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेऊन उत्तम प्रतिसाद दिला ,.तरुण वर्गा प्रमाणेच शिक्षक ,प्राध्यापक, ब्लॉगर व सर्वसामान्य नागरिकांनीही स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला सदर स्पर्धेतील विजेत्यांची नावे मान्यवरांच्या राज्यस्तरीय निवड समितीने नुकतीच जाहीर केली आहेत .व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळा लवकरच पार पाडण्यात येणार आहे शिवाय या स्पर्धेतील सर्व गटातील विजेत्यांच्या आणि इतर काही उल्लेखनीय लेखांचे पुस्तक रूपाने प्रकाशन देखील पार पाडण्यात येणार आहे. सदरच्या स्पर्धेमध्ये शिक्षक प्राध्यापक विभाग, सर्वसाधारण विद्यार्थी विभाग , ब्लॉगर आणि पत्रकार विभाग इत्यादींत गटांमध्ये सदरची स्पर्धा पार पाडण्यात आले असून या स्पर्धेमध्ये शिरपूर तालुक्यातील वनावल जातोडे या गावाचे रहिवासी दगा लोटन पाटील यांनी शिक्षक व अध्यापक या गटातून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे दगा पाटील यांचे तालुका भरातून अभिनंदन होत असून सर्वत्र त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Tags
news
