शिरपूर प्रतिनिधी - होळनांथे गावाट आज भोई समाजाचे कुल दैवत चौधारा आई माता मंदिर व सभा गृहचा भुमिपुजना सोहळा संपन्न झाला. ता वेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार कांशीराम पावरा, उदयोगपती चिंताभाई पटेल, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, प्रा.संजय पाटील,, माजी सरपंच महेंद्र राजपूत,जितेंद्र राजपूत,रघुनाथ भोई,सुभाष भोई,संतोष भोई, लहू गुजर सरपंच भावेर, निकवाडे सर, शिरपूर,
ग्रामपंचायत सदस्य, भोई समाज बांधव, व नागरिक उपस्थित होते.
भोई समाज बांधवांची अनेक वर्षांपासून भोई समाजाचे कुल दैवत चौधारा आई माता मंदिर व सभा गृहची मागणी प्रलंबित होती. ती मागणी पूर्ण होत असल्याने आज भोई समाज बांधव यांच्या कडून आभार व्यक्त होत आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड सुनील भोई यांनी केले तर सूत्र संचालन प्रा बी पी राजपूत सर यांनी केले.
Tags
news
