तपनभाई मुकेशभाई पटेल चॅरेटिबल ट्रस्टच्या वतीने द्वेता पटेल नगर येथे पाण्याच्या टाकीचे लोकार्पण, सौ. मेहा शर्वीलभाई पटेल, आ. काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांची प्रमुख उपस्थिती



शिरपूर - तपनभाई मुकेशभाई पटेल चॅरेटिबल ट्रस्टच्या वतीने स्व. तपनभाई पटेल यांच्या स्मरणार्थ द्वेता पटेल नगर, आंबे येथे पाण्याच्या टाकीचे लोकार्पण तपनभाई पटेल यांच्या भगिनी सौ. मेहा शर्वीलभाई पटेल यांच्या हस्ते तसेच आमदार काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील आंबे गावाजवळ द्वेता पटेल नगर मध्ये रस्ते, पिण्याच्या पाण्याची मुबलक व पुरेशी व्यवस्था, मुबलक सुविधा पुरविण्याचे काम पूर्णत्वाकडे येत आहे. दि. १४ नोव्हेंबर शनिवार रोजी पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आले.


यावेळी तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल,  सौ. मेहा दीदी शर्वीलभाई पटेल (अहमदाबाद), आंबे वि. का. सोसायटीचे चेअरमन रमेश माळी, गुलाब गुजर (प्रोजेक्ट डायरेक्टर, एस. व्ही. के. एम. हॉस्पिटल), पीपल्स बँक चेअरमन योगेश भंडारी, जिल्हा परिषद सदस्य कैलास पावरा, पीपल्स बँक संचालक संजय चौधरी, सामाजिक कार्यकर्ते भालेराव माळी, आंबे सरपंच मुकेश पावरा, काशिनाथ पावरा, पुनश्या पावरा, सजन पावरा, मदन पावरा, अस्तर पावरा, जगतसिंग पावरा, रेहान पावरा, पप्पू पावरा, जितु पावरा, लोहाऱ्या पावरा, कमलसिंग भिल, सुनील जैन, महिला, पुरुष, युवा वर्ग, अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी सौ. मेहा दीदी पटेल म्हणाल्या, माजी मंत्री अमरिशभाई पटेल, मुकेशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, तपनभाई यांनी सुरु केलेले काम यापुढे देखील जोमाने सुरु राहील. सर्वांची सेवा करत राहणे हेच आमच्या परिवाराचे कर्तव्य असून सर्वांना सहकार्य करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले आहे.

अध्यक्षीय भाषणात आमदार काशीराम पावरा म्हणाले, अमरिषभाई पटेल, भुपेशभाई पटेल यांचे कार्य अफाट व महान आहे. त्यांची प्रेरणा घेऊन मी देखील मनापासून एक रुपया न घेता नि:स्वार्थपणे समाज सेवा करतो. भाईंनी आरोग्य सेवा, सर्व मुलभूत सुविधा पुरवून शिरपूर पॅटर्न अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे केल्याने शिरपूर तालुका नेहमीच टँकरमुक्त राहिल्याची बाब आनंददायी आहे. फक्त भाईच हे काम करु शकतात. तालुक्यासाठी पटेल परिवाराचे योगदान मोठे असून त्यांनी शेती, उद्योग, शिक्षण व सर्व क्षेत्रात केलेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे. भाई यांचे नेतृत्वाखाली तालुक्यातील जनतेला सोयी सुविधा देण्याचे काम सुरू आहे.

प्रास्ताविक रमेश माळी यांनी केले. सूत्रसंचालन कु. अनिता पावरा हिने केले. 

तपनभाई मुकेशभाई पटेल चॅरेटिबल ट्रस्टच्या वतीने तालुक्यात अनेक ठिकाणी व्यापक स्वरूपात समाज सेवेचे काम हाती घेण्यात आले आहे. 

आदिवासी बंधू व भगिनी तसेच सर्व ग्रामस्थ यांच्यासाठी आंबे गावाच्या परिसरात सर्वत्र पटेल परिवाराच्या सहयोगातून पर्यटन स्थळ विकसित होत आहे. तालुक्यातील आदिवासी भागात अशी विकासाची गंगोत्री अवतरणे व पर्यटन स्थळ निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे ही फारच आनंदाची व अभिमानाची बाब आहे.

उद्योगपती तथा नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १७ ऑगस्ट २०२० रोजी आंबे येथे द्वेता पटेल नगर चे उद्घाटन करण्यात आले होते. या दिवशी येथील पाड्यांवर ग्रामस्थांना विविध सुखसोयी पुरविण्याबाबत त्यांनी आश्वासन दिले होते. बोटिंग सेवा, विविध सोयी सुविधा पुरविण्यास भुपेशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २५ ऑगस्ट २०२० रोजी प्रारंभ देखील करण्यात आला होता.

माजी मंत्री अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या दूरदृष्टीने शिरपूर पॅटर्नने शिरपूर तालुक्यात कायापालट झाला आहे. तालुक्यातील आंबे गावात आतापर्यंत एकूण ४ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. यामुळे कोट्यवधी लिटर पाणी जमा झाले आहे. शेतात रस्ते तयार करण्यात आले असून येथे मत्सशेतीस चालना देण्यात आली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने