इंदिरानगर, वार्ताहर :शहरातील सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्याही कामासाठी माझ्याशी संपर्क साधावा त्यांना नक्की न्याय मिळेल असे आवाहन पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी इंदिरानगर येथे व्यक्त केले गुरुवार दिनांक 12 वडाळा पाथर्डी रस्त्यावर असलेल्या श्री गुरुकृपा कार सर्विस चे चालक रामचंद्र निषाद यांच्या खुणाचा पाच तासात तपास करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते पोलीस उपायुक्त विजय खरात गुन्हे शाखेचे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार सहाय्यक आयुक्त सुमीर शेख प्रमुख पाहुणे होते श्री पांडे म्हणाले प्रत्येक शुक्रवारी खास दिलेल्या वेळेत सर्वांनी भेट घ्यावी बदली हवी असेल तरीदेखील सांगावे मात्र गुणवत्तेनुसार प्रत्येकाला न्याय दिला जाईल कामांसाठी कोणत्याही मध्यस्थीचा प्रयत्न करू नये असे त्यांनी सांगितले यावेळी तपास कामात सहभाग असलेले सहाय्यक आयुक्त समीर शेख ,इंदिरानगर चे वरिष्ठ निरीक्षक निलेश माईनकर,उपनगर चे सहायक निरीक्षक संतोष खडके, इंदिरानगर चे उपनिरीक्षक प्रवीण बाकले ,सहाय्यक उपनिरीक्षक निखिल बोंडे, राकेश शेवाळे, आडगाव चा उपनिरीक्षक चांदणी पाटील, शिपाई अमर निरगुडे, इंदिरानगर चे उपनिरीक्षक जाकीर शेख, हवालदार शरद आहेर ,पोलीस नाईक रवींद्र राजपूत ,अंबडचे पोलीस नाईक राकेश निकम आणि चंद्रकांत गवळी यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
Tags
news
