शिरपूर : तालुक्यातील अर्थे येथे भारत पेट्रोलियम व माॅ बिजासनी पेट्रोल पंप यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकर्यांसाठी कृषी मेळाव्याचे आयोजन दि.९ नोव्हें रोजी करण्यात आले होते.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी होते तर कृषी मेळावाचे गोपीचंद चौधरी यांचा हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन भारत पेट्रोलियम सेल्स मॅनेजर अमितराय, शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, मा. जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, पं. स. सदस्य डाॅ. शशिकांत गुजर, सामाजिक कार्यकर्ते शामकांत ईशी, पिपल्स बॅन्क संचालक संजय चौधरी, अर्थे बु॥ सरपंच साहेबराव पाटील, अर्थे खु॥ सरपंच अनिल गुजर, टेंभा सरपंच देवा जीभाऊ, ताजपुरी सरपंच हेमंत सनेर, शिरपुर विका चेअरमन दुर्गेश चौधरी, युवराज चौधरी, जगदिश चौधरी, रमेश चौधरी, महेश चौधरी, प्रशांत चौधरी, महेश पाठक, दत्तात्रय नेरकर, दिनेश चौधरी, भरत चौधरी, चेतन पाटील, युवराज जीभाऊ, भगवान गुजर, राजेंद्र चौधरी, अशोक चौधरी, विजय चौधरी, राजु गुजर आदि उपस्थित होते. तर कृषी मेळाव्यास परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कृषी मेळावा यशस्वीतेसाठी माॅ बिजासनी पेट्रोल पंप संचालक ईश्वर चौधरी, कैलास चौधरी, राजेंद्र चौधरी, तुषार चौधरी, पुष्पेंद्र चौधरी, लोकेश चौधरी, योगेश चौधरी, निसर्ग चौधरी आदिंनी परिश्रम घेतलेत.
Tags
news
