कत्तलीसाठी जाणाऱ्या 62 गौवंश जनावरांची सुटका…! पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांची धडाकेबाज कारवाई…! दीपावलीच्या पावन पर्वात 62 जनावरांना जीवनदान



थाळनेर - कालच दीपावली पावन पर्वास सुरवात झाली असून वासू बारसं साजरा करण्यात आला. याच  सणासुदीच्या काळात  सहा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या पथकाने कत्तलीसाठी जाणाऱ्या गौवंश गुरांची मोठ्या शिताफीने सुटका केली आहे.यात गौवंश जनावरांसह एकुण 21 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी आज धनत्रयोदशीच्या सणाच्या दिवशी कत्तलीसाठी जाणाऱ्या 62 गौवंश गुरांची सुटका केली आहे.थाळनेर पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना गुपीत माहिती प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास सचिन साळुंखे यांच्यासह नवनाथ रसाळ,सिराज खाटीक,विजय जाधव,प्रविण ढोले,मुकेश कोळी, अनिल पावरा आदी जणांनी शिरपूर चोपडा रस्त्यावर हिसाळे गावापुढे सापळा रचला.तेथे 4:45 वाजेच्या सुमारास क्रमांक यु.पी.21 सि.एन 3759 या कंटेनरला थांबवले कंटनेरची चौकशी केली असता कंटेनरच्या मागच्या बाजुस गौवंश गुरे निर्दयतेने बांधलेले आढळुने आले.
त्या गुरांची तात्काळ सुटका करून नागेश्वर
 गोशाळा येथे दाखल करण्यात आले.जखमी जनावंरांवर पशुवैद्यकीय अधिकारींमार्फत उपचार देण्यात आला तर यात दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे.गौवंश जनावरे व कंटेनर असा एकुण 21 लाख 45 हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.  या बाबत गुन्हा दाखल झाला असून थाळनेरचे सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे व त्यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने ऐन सणाच्या दिवशी केलेल्या या कार्याबद्दल परिसरात त्यांचेकार्याचे कौतुक होत असून 62 जनावरे यांना त्याच्या मुले जीवनदान प्राप्त झाले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने