शिरपूर : तपनभाई मुकेशभाई पटेल चॅरेटिबल ट्रस्टच्या वतीने स्वर्गीय तपनभाई पटेल यांच्या स्मरणार्थ सुळे, कणगाई, चिलारे गावात प्रत्येक घरी तपनभाई पटेल यांच्या भगिनी सौ. मेहा दीदी शर्वीलभाई पटेल यांच्या हस्ते तसेच उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्यासोबत आमदार काशीराम पावरा, उद्योगपती चिंतनभाई पटेल, योगेश भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
तालुक्यातील आदिवासी भागात जाऊन आदिवासी भगिनी तसेच अनेक युवती, बंधू, भगिनी यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून दि. १२ नोव्हेंबर गुरुवार रोजी ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
तपनभाई मुकेशभाई पटेल चॅरेटिबल ट्रस्ट यांच्या तर्फे सुळे, कणगाई, चिलारे या आदिवासी गावांमध्ये माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाला आमदार काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, सौ. मेहा दीदी शर्वीलभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई अमरिशभाई पटेल, योगेश भंडारी, सुकराम पावरा चिलारे, शिकराम पावरा सुळे, अशोक कलाल, आजी माजी सरपंच, पोलिस पाटील, पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ब्लॅंकेट वाटप झाले. यासाठी गावातील पदाधिकारी, तपनभाई पटेल युवा मंचचे सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थ, युवक यांनी प्रयत्न केले. यापुढे देखील अनेक ठिकाणी ब्लॅंकेटचे वाटप केले जाणार आहे.
स्वर्गीय खासदार मुकेशभाई पटेल यांची सुकन्या सौ. मेहा शर्वीलभाई पटेल यांनी प्रत्यक्ष या गावांमध्ये उपस्थित राहून आदिवासी महिला भगिनींची भेट घेऊन त्यांच्या आरोग्याविषयी माहिती जाणून घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
स्वर्गीय तपनभाई यांनी तालुक्यात अनेक ठिकाणी स्नेहसंबंध निर्माण केल्याचे पाहून याबाबत तेथील लोकांनी माहिती दिल्यावर बहिण सौ. मेहा पटेल या भाऊ स्वर्गीय तपनभाई यांच्या आठवणीने भारावल्या.
यापूर्वी देखील आंबे गावातील द्वेता पटेल नगर येथील पाण्याच्या स्टोरेजची समस्या सोडविण्यासाठी सौ. मेहा शर्वीलभाई पटेल व कु. द्वेता भुपेशभाई पटेल यांनी गोरगरीब आदीवासी लोकांच्या सुखसोयीसाठी पाण्याची टाकी बसविण्याचा तात्काळ निर्णय घेऊन स्व.तपनभाई पटेल यांचे अपूर्ण असलेल्या स्वप्नाची पूर्तता करण्यात आली होती. 'तपनभाई मुकेशभाई पटेल चॅरेटिबल ट्रस्टच्या' माध्यमातून समाज सेवेचे व्रत हाती घेण्यात आले आहे.
यावेळी आदिवासी बंधू-भगिनी देखील भारावले असल्याचे चित्र दिसून आले. आमदार काशीराम पावरा यांनी आदिवासी बांधवांशी एकरूप असलेल्या पटेल परिवाराला लाख लाख धन्यवाद देऊन पटेल परिवाराचे कार्य आदर्शवत व प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन अशोक कलाल व सुनील जैन यांनी केले.
Tags
news
