धुळे, दि. 4 : लेखा व कोशागारे नाशिक विभागाच्या अधिनस्त जिल्हा कोशागार अधिकारी कार्यालय,
धुळे येथील वरीष्ठ लिपीक उदय पद्माकर पाठक, भूषण शांताराम सूर्यवंशी यांच्यासह श्रीमती अनिता सूरसिंग
पावरा यांना उपकोशागार अधिकारी/उपलेखापालपदी पदोन्नती मिळाली आहे. याबाबत विभागाचे
सहसंचालक नि. तु. राजूरकर यांनी आदेश काढले आहेत.
श्री. पाठक, श्री. सूर्यवंशी, श्रीमती पावरा हे अनेक वर्षांपासून जिल्हा कोशागार कार्यालयाच्या सेवेत
कार्यरत आहेत. श्री. पाठक यांची जिल्हा कोशागार कार्यालयातच उपलेखापाल म्हणून, श्री. सूर्यवंशी यांची
उपकोशागार अधिकारी म्हणून शिरपूर येथे, तर श्रीमती पावरा यांची वरीष्ठ भू- वैज्ञानिक, भू-जल सर्वेक्षण
आणि विकास यंत्रणा, धुळे या कार्यालयात उपलेखापाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
वरील तीनही अधिकारी शासकीय सेवेत राहून ते सामाजिक कार्यातही सक्रिय असतात. श्री. पाठक हे
धुळे जिल्हा कोशागार कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत, तर श्री. सूर्यवंशी, श्रीमती पावरा हे धुळे व
नंदुरबार जिल्हा लेखा व कोशागार कर्मचारी पतसंस्थेचे विद्यमान संचालक आहेत.
श्री. पाठक, श्री. सूर्यवंशी, श्रीमती पावरा यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल जिल्हा कोषागार अधिकारी
गजानन रा. पाटील यांच्यासह कोशागार कार्यालयांतील सर्व अधिकारी व कर्मचारी, धुळे व नंदुरबार जिल्हा
कोशागार कर्मचारी संघटनचे अध्यक्ष विश्वास चौधरी, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अतुल ठाकूर यांनीही
अभिनंदन केले आहे.


