शेतकरी अतिवृष्टीच्या संकटातून झोडपून निघाल्यानंतर उरल्यासुरल्या पिकाच उत्पादन घरात टाकन्यामागे लागला आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पीक म्हणून कापूस पिकाकडे पाहिले जाते. उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कपाशी पिकाचे उत्पादन घेतले जाते. अतिवृष्टीमुळे उत्पन्नात यंदा घट झालेली आहे. पण जे उत्पन्न आहे त्याला योग्य भाव मिळावा व शासन दरबारी जाहीर झालेल्या हमीभावात कापसाची खरेदी व्हावी यासाठी CCI च्या माध्यमातून चालू करण्यात येणारे कापूस खरेदी केंद्र लवकर चालू व्हावे यासाठी धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथील शेतकरी संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते जयदीप पवार यांनी मुख्यमंत्र्यांना मेल ने पत्र पाठवत विनंती केली आहे.
उपरोक्त संदर्भीय विषयांवर विनंतीपूर्वक निवेदन सादर करताना जयदीप धनसिंग पवार यांनी म्हटले आहे की.मी एक शेतकरीपुत्र उत्तर महाराष्ट्रातील धुळे तालुक्यातील वेल्हाणे गावाचा रहिवासी. मुख्यमंत्री साहेब सीसीआय च्या माध्यमातून शासन कापूस खरेदी करत असतं या कापूस खरेदी केंद्रांची सुरुवात लवकरात लवकर उत्तर महाराष्ट्रात करण्यात यावी व त्यासाठी होणारी आधीची नाव नोंदणी ही लवकरच सुरू व्हावी.या नाव नोंदणी प्रक्रियेत होणारा गैरव्यवहार टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे व प्रत्यक्ष शेतकऱ्यालाच माल विकता येईल यासाठी कडक पावले उचलावीत. शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक लक्षात घेता हमीभावाने कापूस खरेदी झाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करावे व ज्या ठिकाणी ही कापूस खरेदी होत नसेल अशा ठिकाणी भरारी पथकांची नेमणूक करून धाडी टाकण्यात याव्या. साहेब दर वर्षी आपण कापूस खरेदी केंद्र खूप उशिराने चालू करतात. त्यावेळी निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांचा कापूस विकला गेलेला असतो.आणि नंतर कापूस खरेदी केंद्रांवर प्रचंड प्रमाणात गर्दी वाढल्यामुळे कापूस खरेदी मंदगतीने होते आणि शेतकऱ्यांना खूपच मानसिक त्रास सहन करावा लागतो. ती कापूस खरेदी जर आतापासूनच लवकर चालू केली तर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. कापूस खरेदी सुलभ करता यावी म्हणून जास्तीत जास्त सीसीआय केंद्रांची निर्मिती शासनाच्या माध्यमातून व्हावी अशी इच्छा शेतकरी व्यक्त करत आहेत. त्याचप्रमाणे शेतकरी आणि कर्ज हे समीकरण नेहमीचेच आहे. शेतकर्याच्या उताऱ्यावर कर्जाचा बोजा असल्यामुळे तो उतारा ज्यावेळी कापूस विकण्यासाठी देतो त्यावेळी कापूस खरेदी फेडरेशन ने टाकलेले पैसे बँक परस्पर कापून घेण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे.शेतकरी संपूर्ण वर्ष कष्ट करून शेवटची आशा त्या कापसाच्या पैशांवर असते आणि तेच पैसे जर बँकेने संपूर्ण कापून घेतले तर शेतकऱ्यावर आत्महत्या ची नामुष्की ओढवू शकते त्यामुळे या प्रकरणात लक्ष घालून बँकेला तसे आदेश देऊन कोणतेही शेतकऱ्याकडून सक्तीची कर्ज वसुली करू नये. यंदा ओल्या दुष्काळाच्या सावटामुळे उत्पन्नात घट झाली आहे जेवढे आहे तेवढे शेतकऱ्याच्या हातात पडू द्या हीच सर्व शेतकऱ्यांच्या वतीने नम्र विनंती आणि लवकरच कापूस खरेदी केंद्र सुरळीत चालू होतील व शेतकऱ्यांचाच माल कापूस खरेदी केंद्रात विकला जाईल अशी आशा व्यक्त करून
तरी शासनाने त्वरित कापूस खरेदी केंद्र चालू करावे व बँकांची सक्तीची कर्ज वसुली थांबवावी. अशी विनंती समस्थ शेतकरी वर्गाकडून होत आहे.
Tags
news
