शिरपूर : माजी मंत्री अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांच्या सहकार्याने कुंभीपाडा गावाजवळ मांजनी येथे गावांतर्गत रस्ता तयार करण्यात आला.
ग्रामस्थ यांची अडचण लक्षात घेऊन तातडीने खाजगी स्वरूपात माजी मंत्री अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांनी तातडीने पोकलॉन मशीन, जेसीबी मशीन पाठवून गाव अंतर्गत रस्ता कामाला सुरुवात केली. फत्तेेेपूर गावाजवळ कुंभीपाडा जवळ मांजनी येथे हा गावांतर्गत रस्ता तयार करुन गाव ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत
रस्ता काम करुन देण्यात आले.
यावेळी कामाचा शुभारंभ करतांना शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, शिरपूर पंचायत समितीचे सभापती सत्तरसिंग पावरा, स्वीय सहाय्यक अशोक कलाल, हिमन्या पाटील, आजी माजी सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थ यांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
Tags
news
