धुळे प्रतिनिधी -धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी योगेश राजगुरू यांना मिळालेला गोपनीय माहितीवरून त्यांनी सापळा रचून एका आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व 3 जिवंत काडतुसे जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचला असता चाळीसगाव चौफुली कडून एक इसम डीलक्स काळ्या रंगाची लाल सिल्वर पट्ट्यांची मोटरसायकल क्रमांक एम .एच. 20 एफ.जे. 59 73 त्याच्यावर येऊन सिमेंट गोडाऊन समोर कोणाचीतरी वाट पाहत थांबलेला दिसला .या इसमावर संशय आल्यानंतर बातम्यातील संशयित हाच असावा असा संशय आल्याने रात्री 8.30 वाजताच्या सुमारास छापा टाकून त्याचे विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव सोमीनाथ भगवान लाड 28 राहणार सिल्लोड म्हसोबा गल्ली तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद असे सांगितले व त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेत नेसून असलेले त्यांच्या डाव्या बाजूस एक पुस्तक मिळाले लायसन्स आहे का असे विचारल्यावर त्याने नसल्याचे सांगितले पंचांसमक्ष कारवाई करून सदर इसमाकडून 15 हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तुल, 360 रुपये किमतीचे जिवंत 3 काडतुस, आणि 15 हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 30 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ,.
वरील प्रमाणे गावठी पिस्टल विनापरवाना बेकायदा बालगताना आदळला म्हणून पोलीस नाईक श्याम काळे यांनी त्याच्याविरुद्ध भरतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3 उलंगण 25 प्रमाणे कायदेशीर फिर्याद दिल्याने मोहाडी पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 79/ 2020 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस सब इन्स्पेक्टर मिर्जा करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित ,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू पोलीस सब इन्स्पेक्टर एम.आय. मिर्झा कॉन्स्टेबल प्रभाकर ब्राह्मणे ,श्याम काळे, गणेश भामरे, कांतीलाल शिरसाट, जितेंद्र वाघ ,सचिन वाघ अजय दाभाडे, इत्यादींच्या पथकाने केली आहे
Tags
news
