शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात किसान सभा धुळे जिल्हा व शिरपूर तालुका यांच्या वतीने आज तहसीलदार शिरपूर यांना निवेदन सादर करण्यात आले असून निवेदनातील मागण्या मान्य न झाल्यास 26 नोव्हेंबर रोजी रास्ता रोको करण्याच्या इशारा देण्यात आला आहे .
या निवेदनात किसान सभेच्या शिरपूर तालुका सभासदांच्या वतीने शासनाकडे खालील प्रमाणे मागण्या मागण्यात आले आहेत यात प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या कायदा पास करावा , शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई दीपावली पर्यंत देण्यात यावी, शेतकऱ्यांचे बोंड आळी चे झालेल्या नुकसानाची भरपाई त्वरित देण्यात यावी, शिरपूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द करण्यात यावेत, शेतीविषयक मालासाठी तयार केलेले कायदे रद्द करण्यात यावे, विज विधेयक रद्द करण्यात यावे , कोरोना काळातील विज बिल रद्द करण्यात यावे ,तालुक्यातील सूतगिरणी शेअर धारकांची रक्कम परत करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी किसान सभेचे तर्फे निवेदन देण्यात आले असून सदरच्या मागण्या मान्य न झाल्यास दिनांक 26 नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे सदरच्या निवेदनावर समितीचे सदस्य अडवोकेट मदन परदेशी ,एडवोकेट हिरालाल परदेशी एडवोकेट संतोष पाटील, अर्जुन कोळी ,रामचंद्र पावरा जितेंद्र देवरे, इत्यादींच्या सह्या आहेत
Tags
news