शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील जातोडे व परिसरात इंटरनेट सेवा सुरळीत व्हावी म्हणून आज शिरपूर तालुका करनी सेनेच्या वतीने भारतीय दूरसंचार निगम चे अधिकारी व मा. तहसीलदार व मा. उपविभागीय अधिकारी सो यांना निवेदन सादर करण्यात आले.
शिरपूर तालुक्यातील जातोडे व परिसरात भारतीय दूरसंचार निगमच्या मोबाईल टावर आहे मात्र या टॉवरची सेवा सतत विस्कळीत झाल्यामुळे परिसरातील दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा कोलमडली असून त्यामुळे ग्राहकांचे आणि विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे
सध्या लॉक डाऊन असल्याकारणाने शाळा-कॉलेज बंद असून विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षण ऑनलाईन झाल्यामुळे विद्यार्थी इंटरनेट सेवेवर अवलंबून आहेत मात्र या परिसरातील मोबाईल टावर सतत बंद राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होत असून आगामी काळात ऑनलाइन होणाऱ्या परीक्षा पासून विद्यार्थी वंचित राहणार आहेत त्यामुळे या परिसरातील इंटरनेट सुविधा सुरळीत करावी आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी आज शिरपूर तालुका करणी सेनेच्यावतीने विविध अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी करणी सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष इलेक्ट्रोनिक आणि सोशल मीडिया, महेंद्र सिंह राजपूत ,धुळे जिल्हा अध्यक्ष शिवाजी राजपूत(शिवा पहेलवान) तालुका अध्यक्ष महेंद्र सिंह राजपूत ,आणि किसान करणी सेनेचे जिल्हा सरचिटणीस हिम्मत सिंह राजपूत व जातोडा परिसरातील नागरिकांनी विद्यार्थी उपस्थित होते.
Tags
news