शिरपूर तालुक्यात गांजा शेतीला उधाण, शेती पिकाच्या आडोश्याला गांजाची शेती…! थाळनेर पोलिसांची कारवाई…!




शिरपूर -  शिरपूर तालुक्यात गांजा शेतीला उधाण आले असून तालुक्याच्या कान कोपऱ्यात आता गांजा शेती होत असल्याचे आता समोर येत आहे. पोलिसांच्या कारवाईत जरी गांजा शेतीवर कारवाई होत असली तरी ही बाब तालुक्या साठी चिंताजनक असून एके काळी स्पिरीट चा तालुका म्हणून ओळख असलेला तालुका आता गांजा शेती च्या नावाने  उदयास येत आहे. त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा गांजा हब तयार होऊन अवैध धंदे वाढण्याची चिंता व्यक्त होत आहे
उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांंना मिळालेल्या माहिती नुसार उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथक व थाळनेर पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या पथकाने दि 4 रोजी शिरपूर तालुक्यातील हिसाळे व अनेर डँम रस्त्यावरील अतिक्रमीत वनजमिनीवर कापूस व तूरच्या पिकांच्या शेतीत छापा टाकला.या पिंकामध्ये गांजा पिकाचे लागवड असल्याचे निदर्शनास आले.पोलिसांनी शेतातील 561 किलो गांजाचे ओले झाडे तर 15 हजार किंंमतीचा सुका गांंजा असा एकुण 5 लाख 75 हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. संशयित तेरसिंग उडसिंग पावरा रा.मिष्ठाण जि रतलाम यांनी एकुण 7 एकरात कापूस व तूरच्या पिकात गांजा लागवड केल्याचे यावेळी उघड झाले आहे. या प्रकरणातील आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा मागावर आहेत.रात्री उशिरापर्यंत थाळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल  करण्याची कारवाई सुरू आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने