97 गुरांचे प्राण वाचवण्यात तालुका पोलिस ठाण्याला यश, सांगवी पोलीस स्टेशनच्या पथकाची यशस्वी कामगिरी



शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील तालुका पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक  आणि त्यांच्या पथकास 97 गुरांचे प्राण वाचवण्यात यश आले असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात दोन वाहनांतून गोरे तस्करी होत असल्याची खबर मिळाल्याने शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी हाडाखेड चेक नाक्यावर सापळा रचून दोन वाहने ताब्यात घेतली या वाहनातून तब्बल 97 गुरांची कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी ही वाहने ताब्यात घेत कारवाई केली. यावेळी एका वाहनाचा चालक पळून गेला तर दोघेही पोलिसांच्या हाती लागले याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि अभिषेक पाटील यांना आज पहाटे  मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात गुरे तस्करी होत असल्याची खबर मिळाल्याने त्यांनी कॉन्स्टेबल संजय नगराळे, संजीव जाधव ,राजीव गीते राजेश्वर  कुवर या पेट्रोलिंग वरील कर्मचाऱ्यांना सुचित करून थेट चेकपोस्ट गाठले पहाटे पाचच्या सुमारास पोलिसांना हवे असलेले एम पी /09 / एच जी 60 39 व यूपी 21/ 29 85 हा कंटेनर तपासणी नाक्यावर आला असता पोलिसांनी ही वाहने अडवली यावेळी पोलिसांना पाहून मालक चालक पळून गेला तर त्याला मुक्तीहार नबीनूर मुलतानी वय 40 राहणार बोतलगंज मध्य प्रदेश त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्याने गाडीत गोरे असल्याचे सांगितले पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्यात एकूण 50 गोरे हे दोन टप्प्यात पडलेले आढळले तर दुसऱ्या वाहन चालक फिरोज खान इस्माईल खान वय 32 राहणार चंदन नगर इंदोर त्याच्या गाडीत गाई व गोरे असल्याचे कबूल केले पोलिसांची तपासणीत या वाहनात 12 गाई व 35 गोरे आढळून आले या दोन्ही वाहनातील वाहतुकीच्या कुठलाही परवाना नसल्याने पोलिसांनी 25 लाखांच्या दोन वाहनास पाच लाख 45 हजारचे गुरे असा मिळून एकूण 30 लाख 45 हजार चा मुद्देमाल जप्त करून 97 गुरांना जीवनदान दिले. शिवाय ताब्यात असलेल्या  मुक्तीहार मुलतानी व  फिरोज खान या दोघांसह पळून गेलेल्या चालक अकबर मुलतानी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने