अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय दौरा ओबीसी आरक्षणा विषयी करणार मागदर्शन




शहादा तालुका प्रतिनिधी अश्विन सोनवणे

विभागीय अध्यक्ष बाळा साहेब कर्डक यांची राहणार प्रमुख उपस्थिती

धुळे नंदुरबार जळगावं दौरा
 धुळे येथे दि 20नोव्हेंबर ला ठीक 11 वाजेला तर शहादा जि नंदुरबार येथे  ठीक 4 वाजता आणि जळगाव येथे दि 21 नोव्हेंबर रोजी ठीक 11वाजता  उपस्थित राहणार आहेत 
राज्याचे अन्न नागरी पुरवठा संरक्षण  मंत्री तथा समता परिषदेचे संस्थापक छगनराव भुजबळ यांच्या आदेशाने
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ची  महत्वपूर्ण बैठक शहादा जी नंदुरबार येथील शासकीय विश्राम गृह येथे दि 20 नोव्हेंबर गुरुवारी ठीक 11वाजता  समता परिषदेचे उत्तर विभागीय अध्यक्ष श्री बाळासाहेब कर्डक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न  होणार आहे या बैठकीत
ओबीसींच्या न्यायालयिन बाबी बाबत माहिती देण्यासाठी या प्रसंगी ॲडव्होकेट प्रतीक कर्डक हे उपस्थित असणार आहेत तसेच विभागीय संघटक अनिल नळे विभागिय सरचिटणीस अरुण थोरात, निरीक्षक म्हणून महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष शालिकग्राम मालकर तर नितीन शेलार ,सोशल मीडिया प्रमुख संतोष पुंड हे उपस्थित राहणार आहेत
या बैठकीत ओबीसी च्या आरक्षणा ला धक्का न लावता इतरांना आरक्षण द्यावे आम्हाला कुठल्या ही समाजाला आरक्षण देण्यास नकार नाही परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले पाहिजे अशी मागणी होणार आहे

त्या साठी अखिल भारतीय महात्मा फुले  समता परिषद चे पदाधिकारी  पूर्ण ताकतीने संपूर्ण महाराष्ट्रात  रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात येणार आहे 
यावेळी समता परिषदेची तालुका निहाय बैठका ,आणि विविध सामाजिक संघटनांच्या अध्यक्ष यांच्या शी चर्चा करून योग्य निर्णय बाबत बैठक तसेच
तालुका निहाय समता परिषदेचे मोर्चा बाबत विचार विनिमय आणि जिल्ह्यातील ओबीसी नेते पदाधिकाऱ्यांशी भेटी घाटी घेऊन चर्चा करणे
आदी विषयांवर यावेळी समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक मार्गदर्शन करणार आहेत 
 विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांचा दौराने या उत्तर महाराष्ट्रातील ओबीसीनां आणि समता परिषदेची ताकद बळकट होणार असल्याचे सांगितले जाते
त्या साठी जिल्ह्यातून सर्व ओबीसी समाज बांधवांनी या बैठकीस जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान समता परिषद नंदुरबार जील्हा पदाधिकाऱ्यांनी  केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने