शिरपूर -दिनांक १ ९ / ११ / २०२० दिनांक १८/११/२०२० रोजी शिरपुर तालुका पोलीस येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.अभिषेक पाटील यांना बातमी मिळाली की , उर्मदा ता . शिरपुर गांवाचे शिवारात एका शेतात अवैध रित्या गांजा या अंमली पदार्थाची वनस्पतींचे झाडाची लागवड केली असुन सदर झाडे हि विकण्याचे उददेशाने वाढवली जात आहे . अशी बातमी प्राप्त झाल्याने सदर बातमीचे कारवाई कामी पो.स्टे.चे पथक तयार करण्यात आले . पो.स्टे.चे पथक व आर.सी.पी.पथक रवाना झाले असता बातमी प्रमाणे उर्मदा गावाचे शिवारात आपसिंग दित्या पावरा याचे शेतात कपाशीचे पिकात गांज्याची झाडांची लागवड केलेली दिसुन आल्याने सदर ठिकाणी छापा कारवाई करण्यात आली
असुन सदर ठिकाणाहुन खालील प्रमाणे गांज्या सदृश्य वनस्पतीची झाडे जप्त करण्यात आली आहे . १ ) १४,०८,००० / – रुपये ( चौदा लाख आठ हजार रुपये मात्र ) कि.चा एकुण ७०४ किलो वजनाचा गांजा सदृश्य अमली पदार्थाचे वनस्पतीचे हिरवे ओले ताजे झाडे , पाने व फांदया असलेले मुळांसह , मुळा पासुन ते शेंडया पर्यंत उंची अंदाजे ४ ते ६ फुटापर्यंत कमी जास्त असलेले , मुळास थोडी माती लागलेली प्रती किलो २००० रुपये अदमासे कि . वरील प्रमाणे गांज्याची झाडे जप्त करण्यात आली असुन सदर ठिकाणी आरोपी शेतमालक १ ) अपसिंग दित्या गुलवणे वय -५७ व त्याचे सहकारी २ ) कुवरसिंग मगन वळवी वय -२७ , ३ ) सुनिल बाबुलाल वळवी वय २२ सर्व रा.उर्मदा ता.शिरपुर जि.धुळे अशांना ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द शिरपुर तालुका पो.स्टेचे पो.हे.कॉ. / लक्ष्मण उखा गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एन.डी.पी.एस. कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयात वरील आरोपीतांना अटक करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास पो.स.ई. / नरेंद्र खैरनार हे करीत आहेत . सदर कारवाई मा . पोलीस अधिक्षक श्री.चिन्मय पंडीत सो . , मा.अपर पोलीस अधिक्षक श्री . प्रशांत बच्छाव व मा.उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर श्री.अनिल माने सो . यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि / अभिषेक पाटील , पो.स.ई / नरेंद्र खैरनार पोसई / दिपक वारे पोहेकॉ / लक्ष्मण गवळी , हेमंत फुलपगारे , शामसिंग वळवी , पोना / अनारसिंग पवार , प्रविण धनगर , अनंत पवार , पोकॉ / गोविंद कोळी , योगेश दाभाडे , योगेश मोरे , शामसिंग पावरा महील पो.कॉ / आश्वीनी चौधरी यांनी केली आहे.
Tags
news
