राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक तीन वरील खड्डे न बुजवल्यास शहर शिवसेनेतर्फे आंदोलनाचा इशारा



शिरपूर प्रतिनिधी - आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी शिरपूर तालुका शिवसेनेच्या वतीने शिरपूर शहराजवळील टोल प्राधिकरणाच्या व्यवस्थापक यांना शिवसेने मार्फत निवेदन देण्यात आले असून सदरच्या निवेदनात राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक तीन वर शिरपूर टोल प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात बिजासन घाट ते सावळदे या अंतरावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही शिवाय या रोडवर अपघात यांच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. त्यामुळे टोल प्राधिकरण कंपनीने त्वरित रस्त्याची दुरुस्ती करून दुरुस्ती करावी, शिवाय शिरपूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी व भाजीपाला उत्पादक शेतकरी यांच्या वाहनांना शिरपूर टोल नाक्यावर टोल माफी देण्यात यावी या विनंतीचे निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदनाची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही न झाल्यास शिवसेना पद्धतीने आंदोलन करू असा इशारा देखील यावेळेस देण्यात आला आहे या निवेदनावर उपजिल्हाप्रमुख भरत सिंह राजपूत ,उपजिल्हा संघटक विभा जोगरणा,तालुका प्रमुख अत्तरसिंग पावरा, दीपक चोरमले ,शहर प्रमुख मनोज धनगर, एसटी कामगार सेना जिल्हाध्यक्ष राजू टेलर, उपशहरप्रमुख योगेश ठाकरे , बंटी लांडगे, विभागीय प्रमुख नितीन पावरा,अनिकेत बोरसे, दिनेश गुरव ,सुकलाल पावरा ,इत्यादी शिवसैनिकांच्या निवेदनावर सह्या असून यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने