शिरपूर प्रतिनिधी - आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी शिरपूर शहरातील शहर पोलीस ठाण्यात सर्व मुकेश भाई पटेल ब्लड बँक शिरपूर यांनी रक्तदान शिबिराचा कॅम्प आयोजित केला होता. यासाठी शहर पोलीस स्टेशनच्या आवारात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या रक्तदान कॅम्प मध्ये शहर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत अनेक कर्मचारी यांनी रक्तदान केले. या वेळी या ठीकाणी येऊन शहरातील पत्रकार व इतर सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील रक्तदान केले .आज या कॅम्प मध्ये जवळपास . दुपार पर्यंत 24 लोकांनी रक्तदान केले. रक्तदान हे एक महान काम असून निरोगी लोकांनी रक्त दान केल्यास त्याचा शारीरिक फायदा देखिल होत असतो. त्या मुळे नियमित रक्तदान केले पाहिजे असे रक्त पेढी संचालक यांच्या कडून सांगण्यात आले. या कामात शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी शिबिरा साठी मदत केली.
स्व.मुकेशभाई पटेल ब्लड बँक शिरपूर यांच्या विद्यमाने शिरपूर शहर पोलिस स्टेशण येथे रक्तदान शिबिर
byMahendra Rajput
-
0
