भारतीय कम्युनिस्ट पार्टीतर्फे देशव्यापी निषेध दिन साजरा शिरपूर तालुक्‍यात तहसीलदारांना निवेदन






शिरपूर प्रतिनिधी -  आज शिरपूर तालुक्यात भारतीय कम्युनिस्ट पार्टीतर्फे देशव्यापी निषेध दिन साजरा करण्यात आला असून आज तालुक्या संघटनेच्या वतीने तहसीलदार शिरपूर यांना निवेदन देऊन विविध मागण्या सादर केल्या आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आणि आयटक कामगार संघटनांच्या वतीने आज महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने घेतलेल्या जनविरोधी धोरणाविरुद्ध देशव्यापी निषेध दिन आंदोलन केले गेले त्याचा एक भाग म्हणून आज शिरपूर तालुक्यात कम्युनिस्ट पक्षातर्फे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात खालील प्रमाणे मागण्याची मागणी केली आहे. यात शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द करण्यात यावे, कामगार विरुद्ध करण्यात आलेले सर्व कायदे रद्द करण्यात यावेत, केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्राच्या कंपन्या बाबतच्या घेतलेला निर्णय खाजगीकरण धोरण रद्द करण्यात यावी, कोरोना पेशंटच्या सर्व खर्च सरकारने करावा, दोन काळातील शिक्षणाची फी माफ करावी, प्रत्येक नागरिकाला मोफत रेशन धान्य मिळावे, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना कर पात्र शेतकऱ्यांकडून वसुली करू नये, श्रावणबाळ इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेसाठी जन्म दाखला शाळेचा दाखला मागणी करु नये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दाखला ग्राह्य धरण्यात यावा ,शिरपूर तहसीलदार कार्यालयातील सामान्य नागरिकांची कामे वेळेत करण्यात यावी आणि सीसीआय मार्फत कापूस खरेदी करताना शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबावी इत्यादी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हा सेक्रेटरी एडवोकेट हिरालाल परदेशी चला सल्लागार एडवोकेट मदन परदेशी, तालुका सेक्रेटरी एडवोकेट संतोष पाटील, अर्जुन कोळी जितेंद्र देवरे किशोर सूर्यवंशी भरत सोनार ,रामचंद्र पावरा इत्यादींच्या सह्या आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने