दारुचा अवैध साठा जप्त गुन्हा दाखल की नाही जनतेत सभ्रम, चर्चेला असलोद परिसरात उधान




कृष्णा कोळी असलोद

शहादा - तालुक्यातील असलोद गावात हाॅटेल व्येवसायाच्या नावाखाली बियर शाॅपीच्या नावाखाली अवैधरित्या देशी विदेशी बनावट दारू विक्री सुरू असल्याचे वरिष्ट स्थारावर गंभीर स्वरुपाच्या तक्रारी करण्यात आल्या असल्याची नंदुरबार दारुबंद विभागाला कळवीण्यात आले होते. त्यावरुन संबधित दारुबंदी नंदुरबार विभागाने काल अचानक बियर शाॅपी,हाॅटेल व्येवसायच्या नावाखाली चालणारे अवैधरित्या धदे करणाऱ्यान वर व गावातील हातभटी दारु विक्रेत्यानवर मोठी कार्यवाही केल्याची दिवसभर चर्चा असलोद परिसरात रंगत होती.संबाधित पंथकाने काही पंत्रकाराना अवैध दारू चा मोठा साठा जप्त केल्याची माहिती तर दिली परंतु कोणावर गुन्हे दाखल झाले  या बाबत काय कायदेशीर कारवाई झाली याबाबत कोणालाही सवीस्तर माहीती दिली नाही. त्यामुळे असलोद प्रकरणात   गुन्हा दाखल झाला कि नाही याबत चर्चा रंगत होत्या.गुन्हा दाखल झाल्याची माहिती जनते समोर न आल्याने नंदुरबार दारुबंदी विभागात काय शिजत आहे हे मात्र गुलदस्त्यातच असल्याची आता चर्चा असलोद परिसरात होत आहे.अवैध दारुचा मोठा साठा जप्त केल्याने गुन्हा दाखल असल्याची माहिती जनते समोर येत नसल्याने हे प्रकर संबंधित अधिकाऱ्यान कडुन दाबले जात आहे की काय असे प्रश्न उपस्थीत होऊन याबाबत आता चर्चेला उधाण येत आहे. त्या मुळे या बाबत दारू बंदी विभागाने सविस्तर खुलासा करावा अशी मागणी होत आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने