शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील गांजा प्रकरण राज्यभरात गाजत असताना मागील आठवड्यात राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी पोलीस आणि महसूल विभागावर गंभीर आरोप नोंदवले होते. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने सतर्कता दाखवत पोलीस महसूल आणि वनविभाग यांनी संयुक्त कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करून आदेशित करण्यात आले होते. यानुसार विविध पथकांची नियुक्ती करून तालुका भरातील गांजा शेतीच्या शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते .सदर आदेशान्वये कारवाई करत असताना दिनांक 26 नोव्हेंबर रोजी महसूल प्रशासन ,पोलीस प्रशासन व वनविभाग यांच्या संयुक्त कार्यवाहीत शिरपूर तालुका परिसरात गांजा शेती विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली .सदर मोहिमेमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी शिरपूर अनिल माने, उपविभागीय पोलिस अधिकारी साक्री प्रदीप महाले, तहसीलदार शिरपूर आबा महाजन, सहाय्यक वनसंरक्षक शिरपूर अमित जाधव ,यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत पोलीस ,निरीक्षक हेमंत पाटील शिरपूर शहर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील तालुका पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे थाळनेर पोलीस स्टेशन व शिरपूर उपविभागातील एकूण 10 पोलीस अधिकारी 65 पोलीस कर्मचारी यांचे सह शिरपूर महसूल विभागातील 3 नायब तहसीलदार 13 मंडळ अधिकारी व तलाठी ,सांगवी वनपरिक्षेत्र अधिकारी मेश्राम व त्यांचे 10 वनपाल वनरक्षक ,अशा सर्व अधिकाऱ्यांचे चार पथक तयार करून तालुक्यातील वनपट्टे व महसुली जमिनींची तपासणी करून अवैधपणे गांजा पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शोध घेतला असता चीलारे व लाकडे हनुमान या गावांच्या शिवारात वन जमिनींची तपासणी दरम्यान रतन सिंग पाडवी यांच्या शेतात गांजाच्या झाडांची लागवड केलेली आढळून आली तसेच लाकडया हनुमान गावाच्या शिवारातील वनजमिनीवर राहुज्या नाना पाडवी यांच्या शेतात वाळत घातलेला सुका गांजा मिळून आल्याने सदर दोन्ही इसमा विरुद्ध एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील प्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
यात 12 लाख 10 हजार रुपये किमतीच्या रतन पाडवी यांच्या वनशेती लागवड केलेला गांजाची 605 किलो वजनाची झाडे प्रति किलो 2000 रुपये किंमत आणि 8 लाख 15 हजार रुपये किमतीचे राहूज्या पाडवी यांच्या शेतातील चुका गांजा 163 किलो प्रति किलो 5000 हजार रुपये असा एकूण 20 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरील दोन्ही आरोपी हे पळून गेले असल्याने त्यांचा शोध सुरू आहे महसूल विभागाने या प्रकरणात संबंधित गांज्या लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून त्यांचे वनपट्टे शासन जमा करण्याची कार्यवाही वनविभागामार्फत मा. जिल्हाधिकारी यांच्या मदतीने केली जाणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी कळविले आहे .तसेच यापूर्वी पोलीस विभागाकडून गांजा लागवडीबाबत केलेल्या कारवाईची माहिती वनविभागाकडून घेण्यात येणार असून संबंधित कसूरदार व्यक्तींच्या वन पट्ट्यांवर देखील कारवाई केली जाणार आहे. शिवाय महसूल विभागाचे व पोलिसांचे विविध पथक तालुका भरात गांजा शेती वर कारवाई करणार आहेत .
सदरची कारवाई मा. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव , प्रांताधिकारी सो शिरपूर,विक्रम बादल सो, सहाय्यक वनसंरक्षक शिरपूर श्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यापुढेही वेळोवेळी अशा मोहिमा आयोजित करण्याचे आयोजन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे
Tags
news
