शिरपूर : बोराडी ता. शिरपुर येथील प्रा. पंकज मोतीलाल चौधरी यांना कबचौ उमवितर्फे पीएच. डी. प्रदान झाल्याबद्दल किसान विद्या प्रसारक संस्था सचिव निशांत रंधे यांनी सत्कार करुन अभिनंदन केले. किसान विद्या प्रसारक संस्थेचे इंन्स्टीटयुट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन, बोराडी येथील प्रा. पंकज एम. चौधरी यांना कवीयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठातर्फे पीएचडी प्रदान करण्यात आली त्यांनी अँटीहाइपरटेन्सिव्ह आणि ल्यूकोडर्मा क्रियाकलाप वापरुन विविध वनस्पींवर फार्मसी संशोधन केले. तसेच त्वचारोग वर हर्बल फॉर्म्युलेशनवर पेटंट दाखल केले पीएचडी विषयांवर प्रकाशित पाच संशोधन पेपर व उच्च रक्तदाब आणि त्वचारोगावर संशोधन पूर्ण केले त्यांना प्राचार्यं डॉ. धीरज टी. बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात आंतरराष्ट्रीय समरसता मंच, दिल्ली यांच्याकडुन शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकश्री पुरस्कार 2018 साली देवुन गौरव करण्यात आला. आपल्या विषयावर त्यांनी दोन राष्ट्रीय पुस्तके प्रकाशित केले, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्थरावर 16 संशोधन पेपर प्रकाशीत केलेले आहेत. प्राणी नैतिक समिती सीपीसीएसईए, या आयएईसी कमेटीवर सचिव व मुख्य नॉमिनी सामाजिक जागरूकता सदस्य म्हणून कार्यारत आहेत तसेच विविध समितीन्वर सदस्य म्हणून कार्यारत आहेत. तसेच या सर्व यशाबद्दल प्रा. पंकज मोतीलाल चौधरी यांचे किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव व बोराडी फार्मसी महाविदयालयाचे चेअरमन निशांत रंधे यांचा हस्ते सत्कार करुन त्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश एच. पाटील, प्राचार्य महेश पी. पवार, प्रा. कल्पेश एस. वाघ व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या यशाबद्दल किसान विद्या प्रसारक संस्था अध्यक्ष तथा धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, खजिनदार श्रीमती आशाताई रंधे, बोराडी उपसरपंच राहुल रंधे, कर्मवीर पथसंस्था चेअरमन शशांक रंधे, नगरसेवक रोहित रंधे, प्राचार्यं डॉ. प्रकाश एच. पाटील, प्राचार्यं श्री. महेश पी. पवार, प्रा. कल्पेश एस. वाघ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.
Tags
news